भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रमेश पोवारची निवड केली आहे. यासाठी ३५ अनेक माजी क्रिकेटपटू इच्छूक होते. मात्र बीसीसीआयने माजी फिरकीपटू रमेश पोवारच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
बीसीसीआयने जाहीरात करुन या पदासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. आलेल्या ३५ अर्जामधून सुलक्षणा नाईक, मदन लाल आणि रुद्र प्रताप सिंग यांनी मुलाखती घेऊन अखेर रमेश पवारच्या नावावर एकमत केले. बीसीसीआयच्या वतीने ट्विटरवर याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
-
NEWS: Ramesh Powar appointed Head Coach of Indian Women’s Cricket team
— BCCI Women (@BCCIWomen) May 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details 👉 https://t.co/GByGFicBsX pic.twitter.com/wJsTZrFrWF
">NEWS: Ramesh Powar appointed Head Coach of Indian Women’s Cricket team
— BCCI Women (@BCCIWomen) May 13, 2021
Details 👉 https://t.co/GByGFicBsX pic.twitter.com/wJsTZrFrWFNEWS: Ramesh Powar appointed Head Coach of Indian Women’s Cricket team
— BCCI Women (@BCCIWomen) May 13, 2021
Details 👉 https://t.co/GByGFicBsX pic.twitter.com/wJsTZrFrWF
माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या रमेश पवारने २ कसोटी व ३१ एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. करियरमध्ये खेळल्यानंतर त्याने इसीबी लेव्हल २ सर्टिफाईड कोच म्हणून आणि बीसीसीआय- एनसीए लेव्हल २ चे कोचिंग कोर्सेस केले आहेत. भारतीय महिला संघाचा कोच म्हणून रमेश पवारने यापूर्वी काम केले आहे.
हेही वाचा - Happy International Nurses Day: सचिनने नर्सेसच्या सन्मानार्थ बदलला डीपी, लिहला 'हा' खास संदेश