मुंबई - भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. अजिंक्य सोशल मीडियावर फोटो ट्विट करत याची माहिती दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतानाचा फोटो अजिंक्यने ट्विट केला आहे. त्यासोबत त्याने म्हटलं आहे की, आज मी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. मी सर्वांना रजिस्ट्रेशन करण्याचे आणि डोस घेण्याचे आवाहन करतो.
-
Got my first dose of the vaccine today. I urge everyone to register and get yourself vaccinated, if you’re eligible pic.twitter.com/VH2xYcTQ1i
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) May 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Got my first dose of the vaccine today. I urge everyone to register and get yourself vaccinated, if you’re eligible pic.twitter.com/VH2xYcTQ1i
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) May 8, 2021Got my first dose of the vaccine today. I urge everyone to register and get yourself vaccinated, if you’re eligible pic.twitter.com/VH2xYcTQ1i
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) May 8, 2021
दरम्यान, अजिंक्य भारतीय कसोटी संघाचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ७३ कसोटी सामने खेळली आहे. यात त्याने ४१.२९ च्या सरासरीने ४ हजार ५८३ धावा केल्या आहेत. यात १२ शतकं आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.
अजिंक्यच्या आधी शिखर धवन याने गुरूवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्चमध्ये पहिला डोस घेतला आहे.
हेही वाचा - कोविड-१९ विरुध्दच्या 'विराट' लढाईसाठी विरुष्का सज्ज
हेही वाचा - ''वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'' व इंग्लंड विरुध्दच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा