ETV Bharat / sports

Cricketer Priyanka Ghodke : महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात नाशिकच्या प्रियांका घोडकेची निवड - Cricketer Priyanka Ghodke

महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात ( Maharashtra women's cricket team ) नाशिकच्या प्रियांका घोडकेची निवड. माया सोनवणे आणि ईश्वरी सावकार ह्या दोन खेळाडूंच्या पाठोपाठ आता प्रियांका देखील महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Priyanka Ghodke
Priyanka Ghodke
author img

By

Published : Apr 15, 2022, 10:25 PM IST

नाशिक: नाशिकच्या प्रियांका घोडकेची ( Cricketer Priyanka Ghodke ) महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. माया सोनवणे व ईश्वरी सावकार ह्या दोन खेळाडूंच्या पाठोपाठ आता प्रियांकाची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-20 सामन्यांच्या स्पर्धेसाठी या तिघी आता महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

प्रियांका घोडके फलंदाज व ऑफ स्पिनर ( All-rounder Priyanka Ghodke ) आहे. प्रियांकाने महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे, नोव्हेंबर 2019 मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या टी-20 स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच 2018-19 च्या हंगामात टी-20 स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच महत्वाच्या सामन्यात अर्धशतके झळकावले आहेत. प्रियांकाने देखील 19 व 23 वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही महाराष्ट्रतर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.

तसेच गेल्या ऑक्टोबरमध्ये डेहराडून येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील प्रियांकाने महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ महिला क्रिकेट ( Maharashtra women's cricket team ) संघाचे प्रतिनिधित्व केले होते. प्रियांकाच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघाचे टी-20 स्पर्धेतील सामने पुढील प्रमाणे होणार आहेत -

18 एप्रिल आंध्र

19 एप्रिल केरळ

21 एप्रिल मेघालय

22 एप्रिल हैद्राबाद

24 एप्रिल राजस्थान

हेही वाचा -World Junior Shooting Competition : जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनुष्काची भारतीय संघात निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.