रांची : भारताने दुसऱ्या एकदिवसीय ( India beat South Africa to Level Series ) सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने या विजयासह बरोबरी साधली आहे. श्रेयस अय्यर (113*) ( Shreyas Iyer 113 Run in Match ), इशान किशन (93) यांच्या खेळीने सहज विजय मिळवता आला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. प्रथम फलंदाजी करताना साऊथ अफ्रिकेने 7 बाद 278 धावा ( South Africa Won Toss and Elected to Bat First ) केल्या होत्या. पाहुण्यांसाठी एडन मार्करामने ८९ चेंडूत ७९ धावा ( South Africa posted 278 for seven against India ) केल्या तर कर्णधार केशव महाराजने फलंदाजीचा निर्णय ( South Africa Score in Second ODI ) घेतल्यावर रीझा हेंड्रिक्सने ७६ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (IND vs SA 2nd ODI) आज रांची येथे खेळला गेला. भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यातून शाहबाज अहमदने टीम इंडियासाठी पदार्पण ( India Debut of Shahbaz Ahmed ) केले. त्याला संघाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एकदिवसीय कॅप दिली. दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधार टेंबा बावुमा या सामन्यात खेळला नाही. त्यांच्या जागी केशव महाराज कर्णधार ( Keshav Maharaj is Leading Side in Bavuma Absence ) आहेत. बावुमाशिवाय तबरेझ शम्सीही दक्षिण आफ्रिकेच्या संघात खेळत नाही. रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युन यांना संधी देण्यात आली आहे.
मोहम्मद सिराजची उत्तम गोलंदाजी : भारतीय गोलंदाजांपैकी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 10 षटकांत 38 धावा देऊन तीन बळी घेऊन छान कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध 7 बाद 278 धावा केल्या. पाहुण्यांसाठी एडन मार्करामने ८९ चेंडूत ७९ धावा केल्या, तर कर्णधार केशव महाराजने फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर रीझा हेंड्रिक्सने ७६ चेंडूत ७४ धावा केल्या.