ETV Bharat / sports

Shoaib Akhtar Bollywood : मला बॉलीवूड चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर आली होती - शोएब अख्तर

रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठा खुलासा केला आहे. आपल्याला एका बॉलीवूड चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर आली होती, असे अख्तरने म्हटले आहे.

Shoaib Akhtar
शोएब अख्तर
author img

By

Published : Feb 21, 2023, 9:45 AM IST

कराची (पाकिस्तान) : पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा भारतात मोठा चाहता वर्ग आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रावळपिंडी या त्याच्या मूळ गावावरून त्याला 'रावळपिंडी एक्सप्रेस' असे नाव देण्यात आले आहे. अख्तरचा जन्म तेथेच झाला असून त्याने क्रिकेटमध्ये बरेच नाव कमावले आहे. तरीही, इतर काही खेळाडूंप्रमाणेच त्यालाही अभिनयाची महत्त्वाकांक्षा आहे.

महेश भट्ट यांनी दिली होती ऑफर : एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शोएब अख्तरने सांगितले की, बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 2005 मधील क्राइम ड्रामा चित्रपट 'गँगस्टर' साठी त्याला मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. गेल्या वर्षी अख्तरने त्याच्या बायोपिकचे शीर्षक 'रावळपिंडी एक्सप्रेस : रेसिंग अगेन्स्ट द ऑड्स' असे जाहीर केले. चित्रपटाची निर्मिती सुरू झाली आहे की नाही हे अज्ञात असले तरी, गेल्या महिन्यात अख्तरने ट्विटरद्वारे असहमती आणि कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत चित्रपटापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती.

'रावळपिंडी एक्सप्रेस' नावाने प्रसिद्ध : क्रिकेटच्या खेळपट्टीवर भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. सामन्यादरम्यान दोन्ही बाजूंमधील उत्साह, भावना आणि उत्कटता खेळाडूंना त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करते. शोएब अख्तर हा त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे रावळपिंडी एक्सप्रेस या टोपण नावाने ओळखला जात असे. तो त्याच्या काळातील सर्वोत्तम आणि सर्वात घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत अख्तरने अनेक दर्जेदार गेम चेंजिंग बॉलिंग स्पेल टाकले आहेत. त्याचे काही सर्वात अविश्वसनीय गोलंदाजी कारनामे भारताविरुद्ध घडले आहेत.

बाबर आझमवर केली टीका : एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या संभाषण कौशल्यावर टीका केली आहे. अख्तरने म्हटले की, बाबर आझम हा आज एक मोठा ब्रँड नाही कारण त्याला इंग्रजी येत नाही. त्याने पुढे म्हटले की, क्रिकेट खेळणे एक गोष्ट आहे आणि मीडिया हाताळणे ही दुसरी गोष्ट आहे. जर बाबर चांगले बोलू शकत नसेल तर तो स्वत:ला उत्तमरित्या व्यक्त करू शकणार नाही.

2011 मध्ये निवृत्ती घेतली : आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या अख्तरने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपल्या देशासकडून 163 एकदिवसीय, 14 टी-20 आणि 46 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर 178 कसोटी बळी, 247 एकदिवसीय बळी आणि 21 टी 20 बळी आहेत. 100 मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.

हेही वाचा : Harmanpreet Kaur Record : हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! बनली 150 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली खेळाडू!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.