ETV Bharat / sports

IPL 2022 Till Now : षटकारांचा नवा विक्रम...आणि या मोसमात एकही झाली नाही सुपर ओव्हर - क्रिकेटच्या बातम्या

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक षटकार मारले गेले आहेत. जोस बटलरकडे केवळ ऑरेंज कॅप नाही, तर षटकार मारण्यातही तो आघाडीवर आहे. त्याच वेळी, आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 72 सामने खेळले गेले आहेत. पण एकही सुपर ओव्हर दिसला नाही.

IPL 2022
IPL 2022
author img

By

Published : May 26, 2022, 3:18 PM IST

हैदराबाद: आयपीएल 2022 च्या मोसमात 72 सामने खेळले गेले आहेत. प्लेऑफच्या क्वालिफायर सामन्यात आतापर्यंत या स्पर्धेत एक हजाराहून अधिक षटकार मारले गेले आहेत, जे कोणत्याही मोसमातील सर्वात जास्त आहे. रविवारी (२२ मे) वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हंगामातील शेवटच्या लीग-टप्प्यात झालेल्या सामन्यात हा विक्रम केला गेला. पंजाबच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ( Liam Livingstone ) 1000 वा षटकार मारला.

आयपीएलच्या इतिहासात एका मोसमात 1000 षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2018 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला गेला होता. 2018 मध्येही फलंदाजांनी कहर केला. T20 सारख्या लीगमध्ये मोठे शॉट्स लगावणे बंधनकारक आहे आणि चाहत्यांना ही शैली आवडते. आयपीएलच्या 11व्या मोसमातही खेळाडूंनी चाहत्यांचे जोरदार मनोरंजन केले.

आयपीएल हंगामात आतापर्यंत किती सुपर ओव्हर टाकण्यात आल्या आहेत?

या मोसमात एकूण 872 षटकार मारले गेले होते. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला गेला. पण, यंदा (IPL 2022) हा आकडा मागे पडून आणि हजाराहून अधिक झाला आहे. वर्ष 2019 बद्दल बोलायचे झाले तर आयपीएलच्या 12 व्या हंगामात एकूण 784 षटकारांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर 2020 मध्ये 734 षटकार मारण्याचा विक्रम आहे.

जोस बटलरच्या नावावर सर्वाधिक षटकारांचा विक्रम -

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने ( Opener Jos Buttler )या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 14 सामन्यांत 629 धावा केल्या असून ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. त्याने आतापर्यंत 37 षटकार मारले आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन दुसऱ्या क्रमांकावर आहे. लिव्हिंगस्टोनने आतापर्यंत 34 षटकार मारले आहेत. 32 षटकार ठोकणारा आंद्रे रसेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुलने आतापर्यंत 25 षटकार मारले असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. रोव्हमन पॉवेल 22 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या मोसमात किती चौकार मारले आहेत?

क्विंटन डी कॉकने एका डावात सर्वाधिक षटकार ठोकले -

एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या ( Opener Quinton de Kock ) नावावर आहे. केकेआरविरुद्ध डी कॉकने 140 धावा आणि 10 षटकार ठोकले. रॉबिन उथप्पा आणि जोस बटलर यांनी एका डावात प्रत्येकी नऊ षटकार ठोकले आहेत. ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. चौथ्या क्रमांकावर आंद्रे रसेल आहे, ज्याने एका डावात आठ षटकार ठोकले आहेत. शिवम दुबेनेही एका डावात आठ षटकार मारले असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.

कोणत्या संघाने सर्वाधिक षटकार ठोकलेत -

यावर्षी राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals ) 1000 षटकारांमध्ये 116 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स 113 षटकारांसह दुसऱ्या तर पंजाब किंग्ज 109 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सर्वात कमी षटकारांचे योगदान गुजरात टायटन्स संघाने दिले आहे. त्यांनी 69 षटकार मारले, तर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने 86 षटकार मारले आहेत.

या मोसमात एकही सुपर ओव्हर नाही -

इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या 15 व्या हंगामातील लीग सामने संपले आहेत. या हंगामात एकतर आयपीएलला नवा विजेता मिळेल किंवा राजस्थान इतिहासाची पुनरावृत्ती करेल. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 72 सामने खेळले गेले आहेत, परंतु एकही सुपर ओव्हर दिसली नाही. स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही मोसमात एकही सुपर ओव्हर न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सुपर ओव्हरशिवाय पाच हंगाम खेळले गेले आहेत.

आयपीएल 2020 मध्ये झाल्या होत्या 4 सुपर ओव्हर -

यापूर्वी 2008, 2011, 2012, 2016 आणि 2018 च्या मोसमात एकही सुपर ओव्हर टाकण्यात आली नव्हती. त्याच वेळी, आयपीएल 2009 मध्ये 1, 2010 मध्ये 1, 2013 मध्ये 2, 2015 मध्ये 1, 2017 मध्ये 1, 2019 मध्ये 2, आयपीएल 2020 मध्ये 4 आणि आयपीएल 2021 मध्ये 1 सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती.

सुपर ओव्हरचे काय आहेत नियम -

  • दुसरा डाव संपल्यानंतर 10 मिनिटांनी सुपर ओव्हर सुरू होते.
  • सामन्यात दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करायची असते.
  • सुपर ओव्हर फक्त सामन्याच्या खेळपट्टीवर खेळली जाते.
  • सामन्याच्या शेवटच्या षटकांप्रमाणेच क्षेत्ररक्षणाची नियम कायम असतात.
  • सुपर ओव्हरमध्ये प्रत्येक संघातील फक्त तीन फलंदाज (दोन विकेट) आणि एक गोलंदाज यांना भाग घेण्याची परवानगी आहे.
  • जर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर दुसरी सुपर ओव्हर खेळवली जाते.
  • विजेत्याचा निर्णय होईपर्यंत हे चालूच राहते.

हेही वाचा - एलिमिनेटरमध्ये लखनऊ बाहेर, आरसीबीकडून 14 धावांनी पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.