साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखलं आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत भारतीय फलंदाजांवर वेसण घातले. यात काइल जेमिसनने भारतीय डावाला खिंडार पाडले. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ३१ धावांत ५ गडी टिपले. यासह त्याच्या नावे एका खास विक्रमांची नोंद झाली आहे.
आयसीसीने आयोजित केलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मागील दोन वर्षांपासून खेळवली जात आहे. काइल जेमिसनने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खास विक्रम नोंदवला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध पाच विकेट घेत या स्पर्धेत तो सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
जेमिसनने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाचव्यांदा पाच गडी बाद केलेले आहेत. या यादीत त्याने भारताचे फिरकीपटू अश्विन, अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनला यांना मागे टाकलं आहे. या तिघांच्या नावे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी चार वेळा पाच विकेटची नोंद आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारे गोलंदाज -
१) काइल जेमिसन - ५*
२) आर अश्विन - ४
३) नॅथन लॉयन - ४
४) अक्षर पटेल - ४
हेही वाचा - WTC Final सुरू असतानाच अश्विनची निवृत्तीबाबत मोठी घोषणा
हेही वाचा - WTC Final: टीम इंडिया २१७ धावांत गारद, जेमिसनचा 'पंच'