ETV Bharat / sports

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा माजी फिरकीपटू बलात्कार प्रकरणात दोषी - बलात्कार प्रकरणात दोषी

Nepal Cricketer Sandeep Lamichhane : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधीत्त्व केलेला नेपाळचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. पुढील सुनावणीत त्याच्या शिक्षेची घोषणा केली जाणार असून त्यामुळं त्याची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आलीय.

संदीप लामिछाने
संदीप लामिछाने
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 9:02 AM IST

Updated : Dec 30, 2023, 9:28 AM IST

काठमांडू Nepal Cricketer Sandeep Lamichhane : नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळलेला संदीप लामिछानेला शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. त्यामुळं या युवा क्रिकेटपटूची कारकिर्द धोक्यात आलीय.

2018 मध्ये केलं आयपीएलमध्ये पदार्पण : काठमांडू इथं एका हॉटेलच्या खोलीत एका 17 वर्षीय तरुणीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक करण्यात आलेल्या संदीप लामिछाने यांची नेपाळच्या न्यायालयानं जानेवारीमध्ये सुटका केली होती. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा 23 वर्षीय लामिचाने हा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. त्यानं 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

पुढील सुनावणीत शिक्षेचा निर्णय होणार : नेपाळच्या स्थानिक मिडीयाच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती शिशिर राज ढकल यांच्या एकल खंडपीठानं शुक्रवारी हा आदेश दिला. काठमांडू जिल्हा न्यायालयानं शुक्रवारी लामिछानेला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलंय. तर पुढील सुनावणीत लामिछानेच्या तुरुंगवासाच्या शिक्षेवर निर्णय होणार असल्याचं अहवालात म्हटलंय. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. 12 जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयानं त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते.

अनेक लिगमध्ये प्रतिनिधीत्त्व : लेगस्पिनर लमिछाने हा त्याच्या गुगलीसाठी ओळखला जातो. जगभरातील प्रमुख टी-20 लीगमध्ये तो खूप लोकप्रिय क्रिकेटपटू होता. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग, वेस्ट इंडिजची कॅरेबियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तानची पाकिस्तान सुपर लीग यामध्ये त्यानं आपल्या फिरकीची जादू दाखवलीय. लामिछानेची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अतिशय चमकदार राहिलीय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसरा सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रम आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये तिसरा जलद 50 बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

हेही वाचा :

  1. सरत्या वर्षाच्या आयपीएल लिलावात 'हे' १० खेळाडू रातोरात बनले कोट्यधीश, पाहा संपूर्ण यादी
  2. भारतीय मैदानावरील शेर दक्षिण आफ्रिकेत ढेर; एक डाव अन् 32 धावांनी भारताचा लाजिरवाणा पराभव
  3. डीन एल्गरनं केली भारतीय गोलंदाजांची धुलाई, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; दक्षिण आफ्रिकेला ११ धावांची आघाडी

Last Updated : Dec 30, 2023, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.