मुंबई: राजस्थान रॉयल्सने बुधवारी घोषित केले की, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू नॅथन कुल्टर-नाईल दुखापतीमुळे, आयपीएल 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला ( Nathan Coulter-Nile ruled out of IPL ) आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कुल्टर-नाईलने राजस्थानसाठी तीन षटकांत 48 धावा दिल्या. त्याचबरोबर तो आपली चार षटके देखील पूर्ण करू शकला नाही. कारण दुखापतीमुळे त्याला मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे मैदान ( Out of IPL due to injury ) सोडावे लागले होते.
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे स्पर्धेतील कुल्टर-नाईलच्या भविष्याबद्दल अपडेट दिले आहेत. जिथे संघाचे फिजिओथेरपिस्ट जॉन ग्लोस्टर ( Physiotherapist John Gloucester ) यांनी संघाला संबोधित केले. ग्लोस्टर म्हणाले, मला नॅथनची ओळख करून देण्याची संधी मिळाली. जेव्हा तो पहिल्यांदा बायो-बबल आणि आमच्या कुटुंबाकडे आला होता. दुर्दैवाने, मला त्याला निरोप देण्याचे कठीण काम मिळाले आहे. एखाद्याला गमावणे नेहमीच कठीण असते, विशेषतः जेव्हा ते दुखापतीमुळे होते.
-
Royal(s) night out in Mumbai. 🌟 #RoyalsFamily | #दिलसेरॉयल | #RRvRCB pic.twitter.com/aeZZChHTGE
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Royal(s) night out in Mumbai. 🌟 #RoyalsFamily | #दिलसेरॉयल | #RRvRCB pic.twitter.com/aeZZChHTGE
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022Royal(s) night out in Mumbai. 🌟 #RoyalsFamily | #दिलसेरॉयल | #RRvRCB pic.twitter.com/aeZZChHTGE
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022
राजस्थानने आपला सलामीचा सामना 61 धावांनी जिंकला असला तरी, भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा ( Bowler Navdeep Saini ) पुढील दोन सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी, कुल्टर-नाईलच्या दुखापतीचे स्वरूप उघड केले गेले नाही आणि त्याची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्लोस्टर पुढे म्हणाले, राजस्थानने मेगा लिलावात कुल्टर-नाईलला 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आमच्या टीमच्या आसपास असल्यामुळे आम्ही तुमच्याकडूनही खूप काही शिकलो. त्यामुळे सुरक्षित प्रवास करा आणि तुम्हाला आमच्याकडून जे काही हवे आहे, आम्ही नेहमी येथे आहोत. आम्ही तुमच्यासोबत परत येण्यास उत्सुक आहोत.
-
Royal(s) night out in Mumbai. 🌟 #RoyalsFamily | #दिलसेरॉयल | #RRvRCB pic.twitter.com/aeZZChHTGE
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Royal(s) night out in Mumbai. 🌟 #RoyalsFamily | #दिलसेरॉयल | #RRvRCB pic.twitter.com/aeZZChHTGE
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022Royal(s) night out in Mumbai. 🌟 #RoyalsFamily | #दिलसेरॉयल | #RRvRCB pic.twitter.com/aeZZChHTGE
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 6, 2022
आयपीएल 2022 मध्ये तीन सामने खेळल्यानंतर राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals team ) सध्या चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा चार गडी राखून पराभव केल्याने त्यांना स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारावा लागला. आता त्यांचा पुढचा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे.