नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग 15 मधील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सने आधीच पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर फ्रेंचायझी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या भारतीय खेळाडूंना जुलैमध्ये तीन महिन्यांच्या अनुभव दौऱ्यावर इंग्लंडमध्ये घेऊन जाणार ( Mumbai Indians players tour UK ) आहे.
विविध आधुनिक केंद्रांवर प्रशिक्षणाव्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सच्या तरुण भारतीय खेळाडूंना अनेक काऊंटीच्या शीर्ष क्लब संघांविरुद्ध किमान 10 T20 सामने खेळण्याची संधी मिळेल. आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “एनटी तिलक वर्मा ( NT Tilak Verma ), कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन यांसारखे काही खेळाडू आहेत ज्यांना कठीण परिस्थितीत टॉप टी20 क्लबच्या संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळेल.
तो म्हणाला, यूकेमध्ये उपस्थित असलेला अर्जुन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा क्रिकेटर डेवाल्ड ब्रेव्हिस हे देखील संघात सामील होण्याची शक्यता आहे. भारतीय खेळाडूंच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ देखील इंग्लंडमध्ये उपस्थित राहणार आहे.
स्त्रोताने सूचित केले, पाहा, भारताचा घरचा हंगाम संपला आहे. कर्णधार रोहित शर्मा, अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Fast bowler Jaspreet Bumrah ) सारखे अव्वल खेळाडू राष्ट्रीय संघात आहेत, आमचे आंतरराष्ट्रीय स्टार्सही त्यांच्या वचनबद्धतेत व्यस्त आहेत. पुढील देशांतर्गत हंगाम सुरू होण्यापूर्वी साडेतीन महिने सामना सराव मिळणार नाही म्हणून ज्या खेळाडूंकडे लक्ष देण्याची गरज आहे ते आमचे युवा प्रमुख खेळाडू आहेत.
यूके दौऱ्यासाठी संभाव्य खेळाडूः एनटी टिळक वर्मा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, बासिल थंपी, मुरुगन अश्विन, आर्यन जुयाल, आकाश मेधवाल, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर, देवाल्ड ब्रेविस (विदेशी).