ETV Bharat / sports

Mahela Jayawardane Statement : खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी मुंबईला शर्मा आणि किशनला साथ द्यावी लागेल - महेला जयवर्धने

रोहित आणि इशान ( Rohit Sharma & Ishan Kishan ) चेंडू चांगला फटकावत नसते किंवा त्यांच्यात आत्मविश्वास नसता, तर मला काळजी वाटली असती, पण दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांना खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी मुंबईने शर्मा आणि किशनला साथ द्यावी लागेल, असे महेला जयवर्धनेला वाटते.

author img

By

Published : Apr 22, 2022, 6:32 PM IST

Mahela Jayawardane
Mahela Jayawardane

नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) संघाची कामगिरी आयपीएल इतिहासातील सर्वात खराब प्रदर्शन राहिले आहे. त्यांना सलग सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) आणि यष्टिरक्षक इशान किशन ( Wicketkeeper Ishan Kishan ) यांची फलंदाजीतील अपयश. चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने शर्मा आणि किशनच्या अपयशावर नाराज व्यक्त केली.

या आयपीएल हंगामात, रोहित शर्माने 16.29 च्या सरासरीने आणि 126.66 च्या स्ट्राइक रेटने फक्त 114 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तो चेन्नईविरुद्ध खातेही न उघडता बाद झाला, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक (14) शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे.

आयपीएल 2016 नंतर शर्माची सरासरी 20 राहिली आहे. रोहित चांगली सुरुवात करतोय, पण त्याला केएल राहुल, जोस बटलर किंवा डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ करू शकलेल्या मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतरित करण्यात अपयशी ठरला आहे. दुसरीकडे, किशनने नाबाद 81 आणि 54 धावा करत आयपीएल 2022 मध्ये दमदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर तो मोठा खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. एकूणच, किशनने आयपीएल 2022 मध्ये 31.83 च्या सरासरीने 191 धावा केल्या आहेत. शर्मा आणि किशन यांच्या धावांच्या कमतरतेमुळे, मधल्या फळीला विजयी एकूण धावसंख्या गाठण्यासाठी खूप भार उचलावा लागत आहे, ज्यामुळे ते गुणतालिकेत तळाशी राहिले आहेत.

शर्मा आणि किशनच्या अपयशामुळे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने ( Head Coach Mahela Jayawardene ) खुपच नाराज झाले आहे. ते सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले, प्रामाणिकपणे सांगायचे तर त्यांची कामगिरी वर-खाली राहिली. इशानने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र त्यानंतर तोही धावा करण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मा चेंडूला चांगले प्रकारे हिट करत आहे, त्याने 15-20 धावांसह चांगली सुरुवात केली परंतु मोठ्या डावात तो त्याचे रुपांतर करू शकला नाही.

सराव सत्रात दोघेही चेंडूवर चांगले फटकावत असल्याचे प्रशिक्षक जयवर्धने यांनी सांगितले. मी एक फलंदाज आहे आणि मला समजते की हा खेळाचा एक भाग आहे. ते चेंडू चांगला फटकावत नसते किंवा त्यांच्यात आत्मविश्वास नसता, तर मला काळजी वाटली असते, पण दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांना खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी मुंबईला शर्मा आणि किशनला साथ द्यावी लागेल, असे जयवर्धनला वाटते. वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबईला ( Mumbai against Lucknow Super Giants ) आशा असेल की शर्मा आणि किशन आता स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघासाठी मोठी खेळी खेळतील.

हेही वाचा - National Equestrian Championship : मेरठमध्ये राष्ट्रीय अश्वारोहण स्पर्धेला सोमवारपासून होणार सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.