अहमदाबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies ) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघात खेळणाऱ्या दीपक हुड्डाने आपल्या बालपणीच्या एका स्वप्नाचा खुलासा केला (Deepak Hooda's childhood dream) आहे. जे आता सत्यात उतरले आहे.
-
A candid chat between the two 🙂
— BCCI (@BCCI) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
You do not want to miss this 👌
Stay tuned ⏳#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/lTYm4lnZMx
">A candid chat between the two 🙂
— BCCI (@BCCI) February 9, 2022
You do not want to miss this 👌
Stay tuned ⏳#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/lTYm4lnZMxA candid chat between the two 🙂
— BCCI (@BCCI) February 9, 2022
You do not want to miss this 👌
Stay tuned ⏳#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/lTYm4lnZMx
दीपक हुड्डाची (Cricketer Deepak Hooda) लहानपणापासून इतर खेळाडूंप्रमाणे आपण ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा होती. त्याचबरोबर आपण भारतीय संघात पदार्पण करत असताना पदार्पणाची मानाची कॅप ही विराट कोहली किंवा एमएस धोनीच्या हातून मिळावी अशी इच्छा होती. हे त्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्याला आपल्या पदार्पणाची टोपी विराट कोहलीच्या हातून (Deepak Hooda got debutcap from Virat) मिळाली आहे.
-
From his dreams and motivation to receiving #TeamIndia cap from @imVkohli! 🧢 👍@HoodaOnFire shares it all in this interview with @surya_14kumar after India win the 2⃣nd @Paytm #INDvWI ODI. 👌 👌 By @Moulinparikh
— BCCI (@BCCI) February 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch the full interview 🎥 🔽 https://t.co/5roTjdrMAR pic.twitter.com/dBglzXqmJE
">From his dreams and motivation to receiving #TeamIndia cap from @imVkohli! 🧢 👍@HoodaOnFire shares it all in this interview with @surya_14kumar after India win the 2⃣nd @Paytm #INDvWI ODI. 👌 👌 By @Moulinparikh
— BCCI (@BCCI) February 10, 2022
Watch the full interview 🎥 🔽 https://t.co/5roTjdrMAR pic.twitter.com/dBglzXqmJEFrom his dreams and motivation to receiving #TeamIndia cap from @imVkohli! 🧢 👍@HoodaOnFire shares it all in this interview with @surya_14kumar after India win the 2⃣nd @Paytm #INDvWI ODI. 👌 👌 By @Moulinparikh
— BCCI (@BCCI) February 10, 2022
Watch the full interview 🎥 🔽 https://t.co/5roTjdrMAR pic.twitter.com/dBglzXqmJE
भारतीय संघाने दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजवर 44 धावांनी विजय मिळवल्यानंतर बीसीसीआय टीव्हीवर (Interview Deepak Hooda on BCCI TV) सुर्यकुमार यादवसोबत बोलताना म्हणाला, "मी भारतासाठी पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. ही एक अद्भुत अनुभूती होती. या संघाचा भाग असणे हा मोठा सन्मान आहे."
तो पुढे म्हणाला, "याआधीही जेव्हा मी संघात आलो तेव्हा विराट भाई तिथे नव्हते. मोठे होत असताना मी त्यांना एक लीजंड बनताना पाहिले. माही भाई आधीच लिजंड होते. या दोघांपैकी एकाकडून भारताची कॅप मिळवण्याचे माझे बालपणीचे स्वप्न होते. ते विराच कोहलीच्या हातून कॅप मिळून पूर्ण झाले आणि त्यांच्याकडून कॅप मिळवणे माझ्यासाठी खूप छान होते."
-
Congratulations to @HoodaOnFire who is all set to make his debut for #TeamIndia. #INDvWI pic.twitter.com/849paxXNgM
— BCCI (@BCCI) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to @HoodaOnFire who is all set to make his debut for #TeamIndia. #INDvWI pic.twitter.com/849paxXNgM
— BCCI (@BCCI) February 6, 2022Congratulations to @HoodaOnFire who is all set to make his debut for #TeamIndia. #INDvWI pic.twitter.com/849paxXNgM
— BCCI (@BCCI) February 6, 2022
दीपक हुड्डाला 2017 साली भारतीय टी-20 संघात निवडण्यात आले होते, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळू शकली नव्हती. दीपक हुड्डाला विचारण्यात आले की भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी त्याची प्रेरणा काय होती? यावर उत्तर देताना दीपक हुड्डा म्हणाला, "मी ध्येयापासून विचलित न होता कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो पण तुम्हाला तयार राहावे लागेल."
तसेच तो पुढे म्हणाला की, त्याला प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid), कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून खुप काही शिकायचं आहे. द्रविड, रोहित आणि विराट यांच्यासोबत ड्रेसिंग रूम मध्ये राहण्याची भावनाच वेगळी आहे.