हैदराबाद - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरोधात शनिवारी पहिला सामना पार पडणार आहे. त्यातच आता मोठी घडामोड घडली आहे. भारताचा प्रसिद्ध खेळाडू महेंद्र सिंह धोनीने चेन्नईच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आली ( MS Dhoni Hands Over Captaincy Ravindra Jadeja ) आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्जने सोशल मिडियाच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली आहे.
चेन्नईने रविंद्र जडेजा आणि महेंद्र सिंह धोनीवर बोली लावत रिटेन केले होते. जडेजाला 16 कोटी रुपये मोजले होते. तर, धोनीसाठी 12 कोटी रुपये मोजत रिटेन केले होते. जडेजा हा गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात टीमसाठी योगदान देतो. तसेच, सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अंदाज बांधण्यात येत होता की, जडेजाची कर्णधार पदी नियुक्ती केली जाणार होती.
-
Whist7⃣ePodu 💛 Whist8⃣ePodu@msdhoni @imjadeja pic.twitter.com/TtE0tJdwnp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Whist7⃣ePodu 💛 Whist8⃣ePodu@msdhoni @imjadeja pic.twitter.com/TtE0tJdwnp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022Whist7⃣ePodu 💛 Whist8⃣ePodu@msdhoni @imjadeja pic.twitter.com/TtE0tJdwnp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
जडेजा चेन्नईचा तिसरा कर्णधार - रविंद्र जडेजा 2012 पासून चेन्नईचा सदस्य आहेत. तो चेन्नईचा तिसरा कर्णधार बनला आहे. 2008 साली पासून महेंद्र सिंह धोनी कडे चेन्नईच्या कर्णधार पदाची धुरा होती. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 213 सामने खेळले आहेत. त्यातील 130 सामने जिंकले आहेत. त्यानंतर सुरेश रैनाने सहा सामन्यासाठी कर्णधार पद सांभाळले. ज्याच त्याला फक्त दोनच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्याचप्रमाणे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 साली चार वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे.
हेही वाचा - IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्स संघाचा मोठा निर्णय; मार्क वुडच्या जागी संघात अँड्र्यू टायचा समावेश