ETV Bharat / sports

Mohammed Siraj : आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोहम्मद सिराज ठरला अव्वल गोलंदाज

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा आयसीसी वनडे क्रमवारीत जगातील नंबर 1 गोलंदाज बनला आहे. सिराजने ७२९ गुणांसह पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. सिराजने 2022 मध्ये चांगली कामगिरी करीत, संघात सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या. तर श्रीलंका आणि न्यूझीलंड मालिकेत 15 विकेट्स घेतल्या होत्या.

Mohammed Siraj
मोहम्मद सिराज ठरला अव्वल गोलंदाज
author img

By

Published : Jan 25, 2023, 7:53 PM IST

नवी दिल्ली : आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर-1 भारतीय संघ बनल्यानंतर आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयसीसी वनडे क्रमवारीत जगातील नंबर-1 गोलंदाज बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत सिराज ७२९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ७२७ गुणांसह दुसऱ्या, तर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ७०८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 28 वर्षीय मोहम्मद सिराजने 15 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड सामन्यात वनडे पदार्पण केले.

  • 🚨 There's a new World No.1 in town 🚨

    India's pace sensation has climbed the summit of the @MRFWorldwide ICC Men's ODI Bowler Rankings 🔥

    More 👇

    — ICC (@ICC) January 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सिराजने 21 एकदिवसीय सामने खेळले : मोहम्मद सिराजने 2022 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. अलीकडेच त्याने श्रीलंका मालिकेत 9 आणि न्यूझीलंड मालिकेत 5 बळी घेतले होते. मात्र, न्यूझीलंड मालिकेतील तीन सामन्यांपैकी तो केवळ 2 सामने खेळला. क्रिकइन्फोनुसार, सिराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारतीय गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत हार्दिक पांड्या 80व्या स्थानावर आहे. युजवेंद्र चहल ३९व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 3 बळी घेऊन सामनावीर ठरलेला शार्दुल ठाकूर आता 35 व्या स्थानावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराह २४व्या तर मोहम्मद शमी ३२व्या स्थानावर आहे. गोलंदाज कुलदीप यादव 20 व्या स्थानावर आहे.

सिराजला ODI संघात स्थान : त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी, मोहम्मद सिराजला 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ODI संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्याशिवाय भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने 24 जानेवारीला संघाची घोषणा केली होती. दोन भारतीय खेळाडूंना पुरुष संघात आणि तीन महिला संघात स्थान मिळाले आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचा पुरुष संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

बुमराहचे पुर्नरागमन : तर गेल्या बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर असण्याऱ्या जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती भारतीय गोलंदाजांनी अद्याप जाणवू दिलेली नाही. बुमराहने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीला धार मिळेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, तो लवकरच संघात सामील होणार आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये बुमराह संघात पुनरागमन करू शकेल, अशी आशा रोहितने व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Womens IPL Auction : महिला आयपीएलसाठी संघांचा आज लिलाव, 'या' कंपन्या लावणार बोली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.