ETV Bharat / sports

'तुमचे हात रक्ताने माखलेले', ऑस्ट्रेलियन समालोचकाची आपल्याच पंतप्रधानांवर सडकून टीका

author img

By

Published : May 3, 2021, 8:48 PM IST

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना खडे बोल सुनावले आहे.

Michael slater lashes out at australian government for banning their citizens from india
'तुमचे हात रक्ताने माखलेले', ऑस्ट्रेलियन समालोचकाची आपल्याच पंतप्रधानांवर सडकून टीका

मुंबई - भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण देशात आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातील परिस्थिती पाहून प्रवाशी विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या कठोर निर्णयामुळे भारतात अडकलेले खेळाडू मायदेशी परतू शकत नाहीत. या विषयावरून आयपीएलमधील एका ऑस्ट्रेलियन समालोचकाने थेट त्यांच्या पंतप्रधानांनाच प्रश्न विचारला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना खडे बोल सुनावले आहे. स्लेटर यांनी म्हटलं आहे की, 'जर आमचे सरकार ऑस्ट्रेलिया नागरिकांच्या सुरक्षेची चिंता करत असेल, तर त्यांनी आम्हाला आमच्या घरी पोहोचवायला हवे. पण ही लाजिरवाणी बाब आहे. पंतप्रधान तुमचे हात खुनाने माखलेले आहेत. आमच्याशी असे वागण्याची तुमची हिंमत कशी झाली? तुमच्या क्वारंटाइन सिस्टिमचे काय झालं. मी सरकारकडून आयपीएलमध्ये काम करण्याची परवानगी घेतली होती, पण आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.'

  • If our Government cared for the safety of Aussies they would allow us to get home. It's a disgrace!! Blood on your hands PM. How dare you treat us like this. How about you sort out quarantine system. I had government permission to work on the IPL but I now have government neglect

    — Michael Slater (@mj_slats) May 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, मायकेल स्लेटर भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आयपीएलच्या बायो बबलमधून बाहेर पडले आणि ते मायदेशी परतण्यासाठी प्रथम मालदीवला गेले. पण, तिथून त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये येण्याची परवानगी मिळाली नाही. यामुळे ते मालदीवमध्ये अडकले असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्राने दिलं आहे.

हेही वाचा - IPL २०२१ : चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची भारताला मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.