चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सर्वांत लांब षटकार केरॉन पोलार्डने ठोकला. त्याने शनिवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. पोलार्डच्या आधी या हंगामात सर्वात लांब षटकार ग्लेन मॅक्सवेलने ठोकला होता.
मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डने संघ अडचणीत असताना चांगली खेळी केली. त्याने २२ चेंडूत ३५ धावा काढल्या. डावाच्या १७व्या षटकामध्ये मुजीब रहमानच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने सगळ्यात लांब षटकार खेचला. या षटकाराची लांबी १०५ मीटर होती. आयपीएल २०२१ च्या मोसमातील हा सर्वांत लांब षटकार ठरला. पोलार्डच्या १०५ मीटर षटकाराअगोदर या हंगामातील लांब षटकार मारण्याचा विक्रम बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता. त्याने मुंबईविरुद्धच १०० मीटरचा षटकार खेचला होता.
-
Pollard's 105 meter long six 😳🔥 pic.twitter.com/2IFA2Z7vNH
— राम पारीक (@Pull_Shot) April 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pollard's 105 meter long six 😳🔥 pic.twitter.com/2IFA2Z7vNH
— राम पारीक (@Pull_Shot) April 17, 2021Pollard's 105 meter long six 😳🔥 pic.twitter.com/2IFA2Z7vNH
— राम पारीक (@Pull_Shot) April 17, 2021
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. तेव्हा क्विंटन डी कॉक (४०), रोहित शर्मा (३२) आणि अखेरच्या षटकात पोलार्डने फटकेबाजी करत ३५ धावा केल्याने मुंबई संघाला १५० चा आकडा गाठता आला. प्रत्युत्तरात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत हैदराबादचा डाव १३७ धावांवर संपुष्टात आणला आणि मुंबईने सामना १३ धावांनी जिंकला.
हेही वाचा - IPL २०२१ Points Table : मुंबईची गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप; जाणून घ्या इतर संघाची स्थिती
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई इंडियन्सपुढे सनरायझर्स हैदराबाद मावळला; १३ धावांनी पराभव