दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा नियमीत कर्णधार रोहित शर्मा आज हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागेवर केरॉन पोलार्ड संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. तर स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या देखील आज मुंबई संघात नाहीये.
मुंबई इंडियन्सने आज आपल्या संघात सौरभ तिवारी आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने यांना स्थान दिलं आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या संघात नसून देखील मुंबईचा संघ तगडा दिसत आहे. दुसरीकडे चेन्नईचा संघ देखील संतुलीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात रोमांचक सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई आणि चेन्नई भारतात खेळवण्यात आलेल्या आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात एक वेळा आमने-सामने झालेत. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता.
चेन्नईची प्लेईंग इलेव्हन-
फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाटी रायुडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि जोश हेडलवुड.
मुंबईची प्लेईंग इलेव्हन -
क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अनमोलप्रीत सिंह, कृणाल पांड्या, केरॉन पोलार्ड (कर्णधार), सौरभ तिवारी, एडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
हेही वाचा - आयपीएल 2021 ला सुरूवात होण्याआधी पाहा रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी
हेही वाचा - IPL 2021 : 'आयपीएल 2020 मधील आठवणींसह पुढे पावले टाकू'