ETV Bharat / sports

Road Safety World Series : तब्बल 28 वर्षांनंतर 'या' शहरात सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहायला मिळणार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ) 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा प्रसार करण्यासाठी या शहरात येत आहे. निमित्त आहे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज या खास स्पर्धेचे. ज्यामध्ये क्रिकेट विश्वातील माजी खेळाडू सज्ज होणार आहेत.

Road Safety
Road Safety
author img

By

Published : Apr 15, 2022, 6:32 PM IST

लखनौ: 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा लखनौच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरची ( Master blaster Sachin Tendulkar ) फलंदाजी पाहायला मिळणार आहे. लखनौमध्ये सचिनने 1994 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंग सिद्धू ( Navjyot Singh Sidhu ) यांनी शतके झळकावली. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ( Road Safety World Series ) स्पर्धेत, निवृत्त भारतीय खेळाडूंचा कर्णधार म्हणून खेळण्यासाठी सचिन लखनौला येत आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेला ( Road Safety World Series Competition ) जूनमध्ये सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची प्ले-ऑफ, फायनल आणि लीगचे काही सामने लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवले जातील. त्याची तयारी सुरू झाली आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, दिनेश कार्तिक, ब्रायन लारा आणि मॅथ्यू हेडन याशिवाय जगातील अनेक देशांचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. हे सर्व क्रिकेटपटू पुन्हा एकदा आपली शान दाखवण्यासाठी शहरात येत आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड टी-20 मालिकेचे सामने 4 जूनपासून लखनऊमध्ये खेळवले जातील. इकाना स्टेडियमवर एकूण सात सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 3 जुलै रोजी होईल.

काही सामने हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथेही होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( International Cricket Council ) यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यास हिरवी झेंडा दाखवला आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या मालिकेचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल. तसेच या स्पर्धेचे आयोजन मॅजेस्टिक लिजेंडस् स्पोर्ट्सतर्फे करण्यात आले आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये सहभागा असलेले दिग्गज खेळाडू

या स्पर्धेत सहा संघांचा समावेश - इंडिया लिजेंड्स, श्रीलंका लिजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स आणि बांगलादेश लीजेंड्स हे संघ जेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध भिडतील. सर्व सामने संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत खेळवले जातील. यासाठी व्यवस्था करण्यात येत असल्याचे डीएम अभिषेक प्रकाश सांगितले आहे.

हे सात सामने लखनौमध्ये होणार आहेत -

  • 4 जून इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्टइंडीज लिजेंड्स
  • 5 जून दक्षिण आफ्रिका लिजेंड्स विरुद्ध इंग्लंड लिजेंड्स
  • 29 जून ऑस्ट्रेलिया लिजेंड्स विरुद्ध श्रीलंका लिजेंड्स
  • 30 जून पहिला सेमीफायनल
  • 1 जुलै दूसरा सेमीफायनल
  • 2 जुलै तिसऱ्या स्थानासाठी सामना
  • 3 जुलै अंतिम सामना

हेही वाचा - Root Quits Test captaincy : जो रुटचा मोठा निर्णय; 'या' कारणामुळे सोडले कसोटी कर्णधारपद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.