ETV Bharat / sports

Kl Rahul covid19 Positive : वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, केएल राहुलला कोरोनाची लागण

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. 22 जुलैपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मात्र याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, भारतीय स्टार केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर ( Kl Rahul covid19 tested positive ) आले आहे. खुद्द सौरव गांगुलीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Kl Rahul
केएल राहुल
author img

By

Published : Jul 22, 2022, 4:19 PM IST

हैदराबाद : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह ( KL Rahul covid19 positive ) आढळला आहे. राहुलचे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन सुरू होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी राहुलचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याचे स्वरूप फिटनेस चाचणीवर अवलंबून असेल.

राहुलचे जर्मनीमध्ये यशस्वी ऑपरेशन झाले होते, त्यानंतर तो घरी परतला होता. नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली राहुल बंगळुरू येथील एनसीएमध्ये पुनर्वसन करत होता. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी झुलन गोस्वामी ( Experienced bowler Jhulan Goswami ) नेटमध्ये केएल राहुलला गोलंदाजी करताना दिसली.

केएल राहुल इंडियन प्रीमियर लीग 2022 नंतर पासून क्रिकेटपासून दूर ( KL Rahul away from cricket after IPL )आहे. गेल्या महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी राहुलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु पहिला सामना सुरू होण्यापूर्वीच राहुल दुखापतीमुळे संपूर्ण पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला होता. यानंतर राहुलला संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातून बाहेर राहावे लागले.

राहुल ( Star batsman KL Rahul ) हा अलिकडच्या वर्षांत भारतातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. तो ऑस्ट्रेलियातील आगामी T20 विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. 30 वर्षीय राहुलने त्याच्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी 42 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे.

विंडीज दौऱ्यावर भारतीय संघाला प्रथम शिखर धवनच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची ( ODI series led by Shikhar Dhawan ) आहे. यानंतर पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. 29 जुलै रोजी पहिला T20 ब्रायन लारा क्रिकेट अकादमी (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना वॉर्नर पार्कवर होणार आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा येथे शेवटचे दोन टी-20 सामने खेळवले जातील.

भारताच्या वेस्ट इंडिज दौर्‍याचे वेळापत्रक :

  • 22 जुलै पहिला वनडे, पोर्ट ऑफ स्पेन
  • 24 जुलै दुसरा वनडे, पोर्ट ऑफ स्पेन
  • 27 जुलै , तिसरा वनडे, पोर्ट ऑफ स्पेन
  • 29 जुलै पहिला टी-20, पोर्ट ऑफ स्पेन
  • 1 ऑगस्ट दुसरा टी-20, सेंट किट्स आणि नेव्हिस
  • 2 ऑगस्ट तिसरा टी-20, सेंट किट्स आणि नेव्हिस
  • 6 ऑगस्ट चौथा टी-20, फ्लोरिडा
  • 7 ऑगस्ट पांचवा टी-20, फ्लोरिडा

हेही वाचा - Ultimate Kho Kho 2022 : नाद खुळा! अल्टीमेट खो-खो स्पर्धेत कोल्हापूर-इचलकरंजीचे 22 खेळाडू मैदान गाजवणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.