पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 53 वा सामना शनिवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघात खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सवर 75 धावांनी मोठा विजय नोंदवला. केएल राहुलच्या ( Captain KL Rahul ) नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्ससाठी हा विजय खास होता. कारण ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. लखनौने 11 सामन्यांत 8 विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर केएल राहुलने आपल्या संघाचे खास वैशिष्ट्ये सांगितले आहे.
-
WHAT A WIN this for the @LucknowIPL. They win by 75 runs and now sit atop the #TATAIPL Points Table.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/54QZZOwt2m #LSGvKKR #TATAIPL pic.twitter.com/NYbP1S2xIt
">WHAT A WIN this for the @LucknowIPL. They win by 75 runs and now sit atop the #TATAIPL Points Table.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
Scorecard - https://t.co/54QZZOwt2m #LSGvKKR #TATAIPL pic.twitter.com/NYbP1S2xItWHAT A WIN this for the @LucknowIPL. They win by 75 runs and now sit atop the #TATAIPL Points Table.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
Scorecard - https://t.co/54QZZOwt2m #LSGvKKR #TATAIPL pic.twitter.com/NYbP1S2xIt
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने ( Lucknow Super Giants ) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. यानंतर त्याच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत केकेआरला 15व्या षटकात 101 धावांत गुंडाळले. लखनौच्या शानदार विजयानंतर कर्णधार केएल राहुलने आपल्या संघातील खेळाडूंचे तोंड भरुन कौतुक केले. त्याचबरोबर मोठा विजय मिळवल्यानंतर केएल राहुलने आपल्या संघाचे खास वैशिष्ट्ये सांगितले.
-
Avesh Khan was the pick of the bowlers in the second innings with his bowling figures of 3/19.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #LSGvKKR pic.twitter.com/4iFvBBKFHC
">Avesh Khan was the pick of the bowlers in the second innings with his bowling figures of 3/19.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #LSGvKKR pic.twitter.com/4iFvBBKFHCAvesh Khan was the pick of the bowlers in the second innings with his bowling figures of 3/19.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #LSGvKKR pic.twitter.com/4iFvBBKFHC
कर्णधार केएल राहुल म्हणाला, 'रनआऊट वगळता अधिकत्तर सामन्यात आम्ही वर्चस्व राखले. आम्हाला वाटले की खेळपट्टी संथ आहे आणि येथे 155 धावसंख्या आदर्श असेल. क्विंटन डी कॉक, दीपक हुडा आणि मार्कस स्टॉइनिस यांनी शानदार खेळी करत धावसंख्या 170 धावांच्या पुढे नेली.
-
Quinton de Kock is our Top Performer from the first innings for his fine knock of 50 off 29 deliveries.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his batting summary here 👇👇 #TATAIPL #LSGvKKR pic.twitter.com/qJi3bBmK50
">Quinton de Kock is our Top Performer from the first innings for his fine knock of 50 off 29 deliveries.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
A look at his batting summary here 👇👇 #TATAIPL #LSGvKKR pic.twitter.com/qJi3bBmK50Quinton de Kock is our Top Performer from the first innings for his fine knock of 50 off 29 deliveries.
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
A look at his batting summary here 👇👇 #TATAIPL #LSGvKKR pic.twitter.com/qJi3bBmK50
लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार ( Lucknow Super Giants Captain ) पुढे म्हणाला, 'आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. शैली असणे ही एक गोष्ट आहे, पण दबावाखाली चांगली गोलंदाजी करणे आणि समोर कोण खेळत आहे याचा विचार न करणे, हे आमचे बॉलिंग युनिट खास बनवते. चांगली गोष्ट म्हणजे दबावाखाली त्याच्या खेळाडूंनी ते लक्षात ठेवले. तो म्हणाला, 'सामन्यापूर्वी काही नियोजन केले होते. दडपणाखालीही खेळाडूंनी त्याची आठवण ठेवली हेच उत्तम. संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली. असा एकही सामना मला आठवत नाही. पण आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीत सामने जिंकले आहेत. आम्ही आमच्या योजनेला चिकटून राहिलो आणि जिंकलो, जे विलक्षण आहे.
हेही वाचा - LSG vs KKR : लखनौकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 75 धावांनी पराभव