ETV Bharat / sports

Jasprit Bumrah Baby : जसप्रीत बुमराहच्या घरी बाळाचं आगमन, सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

Jasprit Bumrah Baby : प्रसिद्ध क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशननं सोमवारी मुलाला जन्म दिला. जोडप्यानं त्यांच्या मुलाचं नाव 'अंगद' असं ठेवलंय. वाचा पूर्ण बातमी

Jasprit Bumrah Baby
सप्रीत बुमराहच्या घरी बाळाचं आगमन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 11:59 AM IST

Updated : Sep 4, 2023, 12:20 PM IST

मुंबई : Jasprit Bumrah Baby : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी बाळाचं आगमन झालंय. बुमराहची पत्नी संजना गणेशननं सोमवारी एका मुलाला जन्म दिला. या जोडप्यानं इस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली : जसप्रीत बुमराह आज (सोमवारी) होणाऱ्या आशिया चषकातील नेपाळ विरुद्धच्या सामन्यापूर्वी घरी परतला होता. त्याच्या बाळाचा जन्म, हे या मागचं कारण होतं. बुमराहनं मुलाचं नाव 'अंगद' ठेवलं आहे. त्यानं इंस्टाग्रामवर तिघांचे हात धरलेल्या सुंदर छायाचित्रासह एक पोस्ट शेअर केली. 'आमचं छोटेसं कुटुंब आता वाढलं आहे. आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचं 'अंगद जसप्रीत बुमराह'चं जगात स्वागत केलं. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही', असं बुमराहनं त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं.

पत्नी संजना गणेशन प्रसिद्ध टेलिव्हिजन प्रसारक : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन एक प्रसिद्ध टेलिव्हिजन प्रसारक आहे. हे दोघं मार्च २०२१ मध्ये विवाहबद्ध झाले होते. गोव्याच्या नयनरम्य वातावरणात अत्यंत खासगी स्वरूपात हा विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर दोघांनी एकत्र फोटो शेअर केले. त्यानंतर हे नातं जगजाहीर झालं.

वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुनरागमन : भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या जसप्रीत बुमराहनं पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास वर्षभराच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलंय. आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत तो उत्तम फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानंतर त्याला लगेचच आशिया चषकासाठी भारतीय संघात सामील करण्यात आलं. पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात बुमराह खेळला असला तरी हा सामना पावसामुळे वाहून गेल्यानं त्याला गोलंदाजी करता आली नव्हती.

हेही वाचा :

  1. India vs Nepal Asia Cup २०२३ : 'टीम इंडिया'ला सुपर ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी आज विजय आवश्यक, पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल?
  2. Heath Streak Death : हिथ स्ट्रीकची कर्करोगानं घेतली विकेट, शेवटी अफवा ठरली खरी!
  3. IND vs PAK Asia Cup 2023 : आफ्रिदी-रौफ जोडीसमोर टीम इंडियाचा टॉप ऑर्डर फ्लॉप

Last Updated : Sep 4, 2023, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.