ETV Bharat / sports

Ishan Kishan Birthday : धोनीला जे जमले नाही ते इशान किशन दाखवले करुन - sports news

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनचा आज 24 वा वाढदिवस ( Ishan Kishan Birthday ) आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत दोन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो मागील 4 वर्षापासून मुंबई इंडियन्स संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.

Ishan Kishan Birthday
Ishan Kishan Birthday
author img

By

Published : Jul 18, 2022, 6:24 PM IST

हैदराबाद : भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन आज त्याचा २४ वा वाढदिवस ( Today Ishan Kishan 24th birthday ) साजरा करत आहे. ईशानचा जन्म 18 जुलै 1998 रोजी पाटणा येथे झाला. त्याचबरोबर हा फलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठीही ओळखला जातो. त्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वनडेमध्ये पदार्पण केले होते.

इशानने त्याच्या 23व्या वाढदिवसाला वनडेमध्ये पदार्पण केले ( Ishan Kishan ODI debut on birthday ). गुरशरण सिंगनेही वाढदिवसाच्या दिवशी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गुरशरण सिंगने त्याच्या वाढदिवसादिवशी ८ मार्च 1990 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅमिल्टन येथे वनडे पदार्पण केले. या खेळाडूने आपल्या वनडे कारकिर्दीत फक्त एकच वनडे खेळला आहे. याशिवाय, एकूण आकडेवारी पाहता, इशान हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील 16 वा खेळाडू आहे, ज्याने त्याच्या वाढदिवसा दिवशी पदार्पण केले आहे.

1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या सुरुवातीच्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पिढीसाठी धोनी आदर्श असणे स्वाभाविक आहे. मग जर कोणी झारखंडसाठी खेळत मोठे होत असेल तर ते आणखी सामान्य होते. इशानही धोनीला आपला आदर्श मानतो आणि त्याच्यासारखाच यष्टिरक्षक-फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याची क्षमताही तशीच आहे. मात्र, झारखंडकडून खेळताना ईशानने असे काही केले जे त्याचा आदर्श धोनीही करू शकला नाही. इशानने 2016 च्या रणजी ट्रॉफी मोसमात दिल्लीविरुद्ध 273 धावा केल्या, जी झारखंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती.

अंडर-19 पासून ओळख, तर आयपीएलमधून कमावले नाव -

तसे, इशानला त्याची पहिली मोठी ओळख 2016 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमधून मिळाली. बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेत, तो भारतीय संघाचा कर्णधार होता आणि त्याने संघाला अंतिम फेरीत नेले, जिथे ते वेस्ट इंडिजकडून पराभूत झाले. मात्र, त्यामध्ये स्वत: इशानला फारसा प्रभाव पाडता आला नाही. ज्यामुळे त्याच्या बॅटमधून केवळ 73 धावा झाल्या. असे असतानाही 2016 मध्येच आयपीएल फ्रँचायझी गुजरात लायन्सने त्याला 35 लाखांना विकत ( Ishan Kishan got recognition from IPL ) घेतले.

त्यानंतर 2018 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला सुमारे पाच कोटींमध्ये खरेदी केले आणि तेव्हापासून तो या संघाचा भाग आहे. 2021 चा हंगाम अपेक्षेनुसार जगू शकला नाही, परंतु तरीही, 2022 पूर्वी, मुंबईने त्याला 15.25 कोटी रुपयांच्या सर्वोच्च किंमतीत विकत घेऊन मेगा लिलावात समाविष्ट केले. अशा प्रकारे तो या लिलावाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

निवडकर्त्याने 2 चेंडूत ओळखली प्रतिभा -

इशानने एका शोमध्ये सांगितले होते की, मी बॅटिंगला गेलो, पहिल्या चेंडूवर पूल मारला आणि दुसऱ्या चेंडूवर ड्राईव्ह मारला. यानंतरच तारक सरांनी मला काढून टाकले. मला आश्चर्य वाटले, फक्त दोन चेंडूत परत बोलावले. या चाचणीतून तीन-चार खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्यात माझेही नाव होते. मला आश्चर्य वाटले की त्यांनी 2 चेंडूत असे काय पाहिले. पण, तारक सरांची गोष्टच वेगळी होती. इथून मी झारखंडकडून खेळायला सुरुवात केली.

टीम इंडियात एंट्री -

2020 च्या हंगामातील कामगिरीच्या आधारे इशानला 2021 मध्ये टीम इंडियामध्ये प्रवेश मिळाला. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याला टी-20 पदार्पणाची संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात त्याने केवळ 32 चेंडूत 56 धावा केल्या. त्यानंतर जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे पदार्पणात इशानने केवळ 42 चेंडूत 59 धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी जागा मिळाली.

आतापर्यंतचा प्रवास -

इशान आता टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नियमित भाग आहे आणि काही वेळा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात तो यशस्वी झाला आहे. इशानने टीम इंडियासाठी 18 टी-20 सामन्यांमध्ये 31 च्या सरासरीने आणि 132 च्या स्ट्राइक रेटने 532 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह 88 धावा केल्या आहेत. इशानने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 46 सामने खेळले असून त्यात त्याने 38 च्या सरासरीने 2 हजार 805 धावा केल्या आहेत. इशानने आयपीएलमध्ये आतापर्यंत 75 सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने 132 च्या स्ट्राइक रेटने 1 हजार 870 धावा केल्या आहेत.

हेही वाचा - Shooting World Cup : ऑलिम्पियन अंजुम मौदगिलने नेमबाजीत पटकावले कांस्यपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.