नवी दिल्ली : विराट कोहलीने टी20 विश्वचषक 2022 सामन्यात आतापर्यंत 3 अर्धशतके झळकावली ( Virat Kohli has Scored 3 Fifties ) असून, सर्वाधिक धावा ( ICC Player of the Month Award ) करण्याच्या बाबतीतही तो अव्वल आहे. आता या कामगिरीचा फायदा कोहलीला थेट आयसीसीकडून मिळाला ( Virat Kohli The Star Batsman ) आहे. कारण विराट कोहलीला ( Virat Kohli Bags ICC Mens Player Of The Month Award ) आयसीसीने ऑक्टोबर 2022 चा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार दिला आहे. भारतीयच नाही ( Kohli has Got Benefit of This Performance Directly From ICC ) तर जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला नुकत्याच मानाच्या 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' (ICC Player of the month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात सुरू टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट अप्रतिम खेळी करीत असल्याने त्याला याच खेळीची जणू पोचपावती मिळाली आहे.
-
A batting stalwart wins the ICC Men's Player of the Month award for October after some sensational performances 🌟
— ICC (@ICC) November 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Find out who he is 👇
">A batting stalwart wins the ICC Men's Player of the Month award for October after some sensational performances 🌟
— ICC (@ICC) November 7, 2022
Find out who he is 👇A batting stalwart wins the ICC Men's Player of the Month award for October after some sensational performances 🌟
— ICC (@ICC) November 7, 2022
Find out who he is 👇
आणखी दोन खेळाडू झाले होते नाॅमिनेट परंतु विराटची लागली वर्णी : विराटसोबत वर्ल्डपमध्ये चांगली कामिगिरी करणारे आणखी दोन खेळाडूही नॉमिनेट झाले होते. यामध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा ( Sikandar Raza ) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश होता. पण, विराटची खेळीही विराट असून, प्रेक्षकांनीही त्यालाच पसंती दिल्याने विराटने पुरस्कारावर नाव कोरले आहे. तर महिलांमध्ये पाकिस्तानची निदा दार विजयी झाली.
विराटने आपला कमालीचा खेळ दाखवण्यास केली सुरुवात : मागील बरीच वर्षे भारताकडून क्रिकेट खेळणाऱ्या विराटने काही महिन्यांपूर्वी कर्णधारपद सोडले. 2019 च्या अखेरीसपासून खराब फॉर्मात विराट होता. 70 शतकं ठोकणाऱ्या विराटला 71 वे शतक काय करता येत नव्हता. पण बरीच मेहनत आणि सराव करून अखेर 2022 च्या आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध विराटने शतक ठोकलं आणि पुन्हा एकदा तो फॉर्मात परतला. त्याने पुन्हा एकदा आपला कमाल खेळ जगाला दाखवण्यास सुरुवात केली असून, ऑस्ट्रेलियात सुरू टी20 विश्वचषक स्पर्धेत ( T20 World Cup 2022 ) विराट टीम इंडियासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी करीत आहे. भारताचे पाच सामने विश्वचषकातील खेळले असून, यातील तीन सामन्यात विराटने अर्धशतक झळकावत तो नाबाद राहिला आहे. त्यामुळे विराट भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलत असल्याचे दिसत आहे.
कोहलीची टी20 वर्ल्ड कप 2022 मधील कामगिरी : विश्वचषकाची सुरुवात झाल्यापासून विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. सर्वात पहिला भारताचा सामना पाकिस्तानसोबत झाला. ज्यात एकीकडे भारतीय फलंदाजी ढासळत असताना विराटने एकहाती झुंज दिली. त्याने सामना जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 62 धावा विराटने केल्या. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट 12 धावाच करू शकला. पण मग बांगलादेशविरुद्ध विराट 44 चेंडूत 62 धावा करून पुन्हा फॉर्मात परतला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने 26 धावा केल्या आहेत. अशा रितीने एकूण 5 सामन्यांत त्याने 246 धावा केल्या आहेत.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड : आयसीसीने (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरुष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये भारताची जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा आणि पाकिस्तानच्या निदा दार यांना नामांकित करण्यात आले आहे.