बंगळुरू : तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशन ( Tamil Nadu Batsman Narayan Jagadeesan ) याने सोमवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अरुणाचल ( Jagadeesan Sets World Record in List A ) प्रदेशविरुद्ध शानदार विक्रम ( Jagadeesan Made a Brilliant Record Against Arunachal Pradesh ) केला. त्याने 141 चेंडूत 277 धावांची खेळी खेळून लिस्ट ए क्रिकेटमधील ( Jagadeesan Made a World Record For Highest Individual Score in List A ) सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम ( Vijay Hazare Trophy One Day Cricket Tournament ) केला. सव्वीस वर्षीय जगदीशनने अॅलिस्टर ब्राउनचा (2002 मध्ये) सर्वाधिक 268 धावांचा लिस्ट ए स्कोअरचा विक्रम मोडला. जगदीशनने या खेळीदरम्यान रोहित शर्माचा एका भारतीयाकडून सर्वोच्च लिस्ट ए स्कोअरचा विक्रमही मोडला. ज्याने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात २६४ धावा केल्या होत्या.
-
Records galore in Bengaluru 🔥🔝
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Take a look at some magical milestones from the Tamil Nadu innings courtesy of @Jagadeesan_200 & B Sai Sudharsan 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/LIs4Hkd0gM#ARPvTN | #VijayHazareTrophy pic.twitter.com/wq1Ym0rUcT
">Records galore in Bengaluru 🔥🔝
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 21, 2022
Take a look at some magical milestones from the Tamil Nadu innings courtesy of @Jagadeesan_200 & B Sai Sudharsan 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/LIs4Hkd0gM#ARPvTN | #VijayHazareTrophy pic.twitter.com/wq1Ym0rUcTRecords galore in Bengaluru 🔥🔝
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 21, 2022
Take a look at some magical milestones from the Tamil Nadu innings courtesy of @Jagadeesan_200 & B Sai Sudharsan 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/LIs4Hkd0gM#ARPvTN | #VijayHazareTrophy pic.twitter.com/wq1Ym0rUcT
जगदीशनने केवळ 114 चेंडूत 200 धावांचा आकडा पार केला : दरम्यान, तो लिस्ट ए इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज बनला. उजव्या हाताच्या फलंदाजाने सलग पाचवे List A शतकही झळकावले, जो एक नवा विक्रम आहे. जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येसाठी पृथ्वी शॉचा (पुद्दुचेरीविरुद्ध २२७ धावा) विक्रमही मागे टाकला. तामिळनाडूचा यष्टिरक्षक फलंदाज भारताच्या सर्वोच्च एकदिवसीय स्पर्धेत द्विशतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला.
जगदीशनने बी साई सुदर्शनसह पहिल्या विकेटसाठी 416 धावा जोडल्या : जे लिस्ट ए क्रिकेटमधील कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम आहे. सुदर्शनने 102 चेंडूत 19 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 154 धावा केल्या. शनिवारी सलग चौथ्या शतकासह जगदीशनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके झळकावण्याच्या बाबतीत कुमार संगकारा, अल्विरो पीटरसन आणि देवदत्त पदीकल यांची बरोबरी केली. जगदीशनने हरियाणा, छत्तीसगड, आंध्र आणि गोव्याविरुद्ध सुरू असलेल्या विजय हजारे स्पर्धेत सोमवारी अरुणाचलविरुद्ध 277 धावा करण्यापूर्वी शतके झळकावली. पुढील महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने जगदीशनला कायम ठेवलेले नाही.
या मोसमातील विजय हजार ट्रॉफीमध्ये जगदीशनची कामगिरी : पहिला सामना : बिहारविरुद्ध सहा चेंडूत पाच धावा. दुसरा सामना : आंध्र प्रदेशविरुद्ध 112 चेंडूत नाबाद 114 धावा केल्या. 12 चौकार आणि दोन षटकार मारले. तिसरा सामना : छत्तीसगड विरुद्ध 113 चेंडूत 107 धावा केल्या. 10 चौकार आणि दोन षटकार मारले. चौथा सामना : गोव्याविरुद्ध 140 चेंडूत 168 धावा केल्या. १५ चौकार आणि सहा षटकार मारले.पाचवा सामना: हरियाणाविरुद्ध १२३ चेंडूत १२८ धावा. सहा चौकार आणि सहा षटकार मारले. सहावा सामना: अरुणाचल प्रदेश विरुद्ध 141 चेंडूत 277 धावा केल्या. 25 चौकार आणि 15 षटकार मारले.
लिस्ट अ क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या : नारायण जगदीशन 277 (141) अॅलिस्टर ब्राउन - 268 (160) रोहित शर्मा - 264 (173) डी'आर्सी शॉर्ट - 257 (140) शिखर धवन - 248 (150). गेल्या पाच डावांमध्ये 5 शतके विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात जगदीशन बॅटने खूप धावा करीत आहे. गेल्या 5 डावांत त्याने सलग 5 शतके झळकावली आहेत. या फलंदाजाने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे.