ETV Bharat / sports

IPL 2023 : हैदराबादचा पंजाबवर 8 गडी राखून दणदणीत विजय; शिखरची खेळी व्यर्थ - Sunrisers Hyderabad

सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज दिवसातला दुसरा सामना पार पडला. यात हैदराबादचा विजय झाला आहे. हेदराबादने 8 विकेट राखून विजय मि्ळवला आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असल्याने पंजाबला 143 धावांपर्यंत रोखता आले होते.

IPL 2023
आज दुहेरी हेडर-डेमध्ये सनरायझर्सचा सामना होणार पंजाबशी
author img

By

Published : Apr 9, 2023, 7:56 PM IST

Updated : Apr 9, 2023, 11:04 PM IST

हैदराबाद : आज रविवार असल्याने डबल हेडर-डे आहे. आजचा दुसरा सामना हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडीयम, हैदराबादला खेळवण्यात आला होता. यात बैदराबादने विजय मिळवला आहे.

हैदराबादची भेदक गोलंदाजी - हैदराबादच्या गोलंदाजांसमोर पंजाबची फलंदाजी पत्त्यांसारखी ढासळली. एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. प्रभसिमरन याला तर खातेही उघडता आले नाही. भुवनेश्वर कुमारने त्याला आऊट केले. सॅम करन याने 15 चेंडूत 22 धावा काढल्या आहेत. त्यामुळे हैदराबादच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली आहे. एकीकडे विकेट पडत असताना शिखर धवनने संयमी फलंदाजी केली.

धवनची स्फोटक खेळी - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ज्यामुळे पंजाब किंग्ज संघाला २० षटकात १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबसाठी संघाचा कर्णधार शिखर धवनने ६६ चेंडूत सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली, तर हैदराबादकडून मयंक मार्कंडेने चेंडूसह ४ बळी घेतले.

भागीदारीने पंजाबला सावरले - पंजाब किंग्जने ६९ धावांपर्यंत आपला निम्मा संघ गमावला होता, त्यानंतर शिखर धवन एका बाजूने संघाची धावसंख्या वाढवत राहिला, तर दुसऱ्या बाजूकडून विकेट्स पडण्याची प्रक्रिया सातत्याने पाहायला मिळाली. या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला, यात कर्णधार धवनने ९९ धावांची नाबाद खेळी केली. मोहित राठीसह धवनने अखेरच्या विकेटसाठी ५५ धावांची शानदार भागीदारी केली.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इल्हेवन : एडन मार्कराम (कर्णधार), मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि आदिल रशीद. पंजाब किंग्ज प्लेइंग इल्हेवन : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, सॅम करण, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

हेही वाचा : IPL 2023 : चेन्नईचा मुंबईवर 7 गड्यांनी विजय, अजिंक्य रहाणेचे दमदार अर्धशतक

Last Updated : Apr 9, 2023, 11:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.