ETV Bharat / sports

Rishabh Pant In Stadium : दिल्लीला सपोर्ट करण्यासाठी पंत पोहचला स्टेडियममध्ये, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - ऋषभ पंत अरुण जेटली स्टेडियममध्ये

गेल्या वर्षी झालेल्या भीषण अपघातानंतर भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र काल तो दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि गुजरातचा सामना पाहण्यासाठी पोहचला. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटर हँडलवरून ऋषभ पंत स्टेडियममध्ये बसून सामना पाहत असल्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

Rishabh Pant In Stadium
ऋषभ पंत
author img

By

Published : Apr 5, 2023, 4:18 PM IST

नवी दिल्ली : काल दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना खेळला गेला. यावेळी भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत स्वतः दिल्लीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचला होता. पंतने तेथे बसून संपूर्ण सामना पाहिला. मैदानात उपस्थित प्रेक्षकांनीही पंतच्या नावाचे पोस्टर दाखवून त्याचे स्वागत केले. पंतला बर्‍याच दिवसांनी स्टेडियममध्ये पाहून खेळाडूंसह चाहतेही आनंदी झाले होते. पंतचे स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहेत.

Rishabh Pant
ऋषभ पंत

वॉकिंग स्टिकच्या मदतीने स्टेडियममध्ये आला : दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटर हँडलवरून ऋषभ पंत स्टेडियममध्ये बसून सामना पाहत असल्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. ऋषभ पंतचे स्टेडियममध्ये बसून सामना पाहणे चाहत्यांसाठी खूप खास होते. गेल्या वर्षी झालेल्या भीषण अपघातानंतर पंत पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पोहचला होता. तो दिल्ली कॅपिटल्सला चिअर करण्यासाठी आला होता. पंत स्टेडियममध्ये वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालत आला आणि त्यानंतर त्याने स्टँडवर बसून सामना पाहिला.

Rishabh Pant
ऋषभ पंत

खेळाडूंनी दिला पंतला खास संदेश : अरुण जेटली स्टेडियमधील ऋषभ पंतचा व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. यावर कमेंट करून चाहते त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. दिल्ली कॅपिटल्सने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, रोवमन पॉवेल आणि अक्षर पटेल यांच्यासह अनेक खेळाडूंनी त्याला लवकर बरे हो, असे म्हटले आहे. त्यासोबतच दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी देखील यावेळी पंतची भेट घेतली.

पृथ्वी शॉचा फ्लॉप शो : ऋषभ पंत स्वतः दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला आणि त्याने आपल्या संघाला खूप प्रोत्साहन दिले. मात्र या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरातने दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. आयपीएलच्या या हंगामात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने दोन सामने खेळले असून या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ आयपीएलच्या या मोसमात सपशेल अपयशी ठरतो आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्याने 5 चेंडूत केवळ 7 धावा केल्या. या आधी, 1 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील त्याला केवळ 12 धावा करता आल्या.

हेही वाचा : Shreyas Iyer Injury : श्रेयस अय्यरच्या पाठीवर परदेशात होणार शस्त्रक्रिया, विश्वचषकात खेळणे अनिश्चित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.