ETV Bharat / sports

Jos Buttler : जोस बटरलने केली विराट कोहलीच्या 'या' विक्रमाशी बरोबरी - जोस बटरलने केली विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

राजस्थानने बंगळुरूला सात विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात जोस बटलरने तुफान खेळी केली. तसेच, यंदाच्या हंगामात जोसने चार शतके ठोकून विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Jos Buttler
Jos Buttler
author img

By

Published : May 28, 2022, 5:47 PM IST

मुंबई - आयपीएल 2022 च्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात क्वालिफायर सामना रंगला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेलल्या या सामन्यात राजस्थानने बंगळुरूला सात विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात जोस बटलरने तुफान खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने 14 वर्षानंतर अंतिम फेरी गाठली. तसेच, यंदाच्या हंगामात जोसने चार शतके ठोकून विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

यंदाच्या हंगामात राजस्थान कडून खेळताना जोस बटलरने 3 शतके केली होती. त्यानंतर काल ( 27 मे ) बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात जोसने आणखी एक ठोकले. तसेच, एक हंगामात त्याने 800 धावांचा टप्पा ओलांडत चार शतके ठोकून विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी विराट कोहलीने 2016 साली आयपीएलमध्ये ही कामगिरी केली होती.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स विरोधात सुरुवातील विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस दोघे सलामीला उतरले. विराट 7 तर डू प्लेसिसने 25 धावांवर बाद झाला. रजत पाटीदारने 42 चेंडूनत 4 चौकार आणि 3 षटकांरासह 58 धावा केल्या. त्यानंतर मात्र बंगळुरुचा संघ गडगडला. महिपाल लोमरोर (8), दिनेश कार्तिक (6), वानिंदू हसरंगा (०), हर्षल पटेल (1) दोघे बाद झाले. शाहबाज अहमदने नाबाद 12 धावा करत संघाला १५० पार मजल मारून दिली.

त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान संघाकडून यशस्वी जैस्वालने 21 धावा केल्या. नंतर, कर्णधार संजू सॅमसनने 23 धावा ठोकल्या. जोस बटलरने तुफानी खेळी केली. देवदत्त पडिक्कलला १२ चेंडूत ९ धावाच करता आल्या. पण बटलरने एकतर्फी सामना जिंकवून दिला. त्याने आधी २३ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर तीच लय कायम राखत दणदणीत शतक ठोकलं. जोसचे हंगामातील हे चौथे शतक होते.

हेही वाचा - Symonds Funeral ceremony : पाँटिंग आणि गिलख्रिस्टसह दिग्गज खेळाडूंनी सायमंड्सला दिला शेवटचा निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.