ETV Bharat / sports

IPL 2023 : लखनऊचा हैदराबादवर 7 गडी राखून विजय, मांकडच्या नाबाद 64 धावा

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला आहे. लखनऊकडून प्रेरक मांकडने 45 चेंडूत नाबाद 64 धावांचे योगदान दिले.

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
author img

By

Published : May 13, 2023, 3:35 PM IST

Updated : May 13, 2023, 7:25 PM IST

हैदराबाद : आयपीएल 2023 मध्ये आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होता. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला आहे. हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनऊविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या. प्रत्युतरात लखनऊने 19.2 षटकांत 185-3 धावा करत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग 11) : अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी ; इम्पॅक्ट प्लेअर्स - विव्रत शर्मा, सनवीर सिंग, मयंक डागर, नितीश कुमार रेड्डी, मार्को जॅनसेन.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, क्रुणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स - स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक हुडा, अर्पित गुलेरिया.

एडन मार्करम : आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. विकेट चांगली आहे. आशा आहे की, आम्ही चांगली धावसंख्या उभारू आणि स्कोअरबोर्डवर दबाव टाकू. तुम्हाला परिस्थितीनुरूप संघासाठी काय काम करेल याचा समतोल साधावा लागेल. दिवसाच्या मॅचमध्ये तुम्ही पिच जास्त बदललेले पाहू शकत नाही. आम्ही स्पर्धेत रोमांचक स्थितीत आहोत. आशा आहे की त्यामुळे आम्ही आमच्यातले सर्वोत्तम देऊ शकू. आमच्याकडे एक अष्टपैलू फलंदाज सनवीर सिंग आहे. तो आमच्या संघात येतो आहे.

कृणाल पंड्या : आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. पण मला गोलंदाजी केली तरीही काही हरकत नाही. आमच्यासाठी हा चढ - उताराचा हंगाम राहिला आहे. आम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल, हेच महत्त्वाचे आहे. विकेट चांगली दिसते आणि ती तशीच खेळेल. आमच्या संघात काही बदल आहेत. हुड्डा आणि मोहसिन यांच्या जागी प्रेरक आणि युद्धवीर टीममध्ये आले आहेत.

हेही वाचा :

  1. Yashasvi Jaiswal Records : 21 वर्षांच्या यशस्वीने एकाच सामन्यात मोडले आयपीएलमधील अनेक विक्रम, जाणून घ्या..
  2. Virat Kohli Instagram Post : राजस्थान विरुद्धच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर केला 'हा' फोटो शेअर, म्हणाला..
  3. IPL 2023 : कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी होणार ? दोन्ही संघांना संधी

Last Updated : May 13, 2023, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.