हैदराबाद : दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा घरच्याच मैदानावर 7 धावांनी पराभव केला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 34 वा सामना सोमवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत 7-7 सामने खेळले आहेत. या दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकून बरोबरी साधली आहे. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 10 व्या क्रमांकावर असून हैदराबाद आणि 9व्या क्रमांकावर आहे.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या. दिल्लीकडून फलंदाजी करताना मनीष पांडेने 27 चेंडूत 34 तर अक्षर पटेलने 34 चेंडूत 34 धावा करून चांगले योगदान दिले. याशिवाय मिचेल मार्शने 15 चेंडूत 25 आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 20 चेंडूत 21 धावा करत दिल्ली संघाकडून धावाचा डोंगर करण्यासाठी मदत केली. हे लक्ष्य गाठण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 137 धावा करता आल्या आहेत.
मयंक अग्रवालच्या सर्वाधिक धावा- सनरायझर्सकडून मयंक अग्रवालने ३९ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा केल्या. पण, ही खेळी व्यर्थ ठरली आहे. हेनरिक क्लासेनने 19 चेंडूत 31 धावा, वॉशिंग्टन सुंदरने 15 चेंडूत 24 धावा आणि राहुल त्रिपाठीने 21 चेंडूत 15 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी घेतले. सनरायझर्सच्या गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने 2, टी नटराजनने 1 बळी घेतला. दिल्लीकडून गोलंदाजी करताना, एनरिक नॉर्टजे आणि अक्षर पटेल यांनी 4-4 षटके टाकत प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. इशांत शर्माने 3 षटकांत 1 आणि कुलदीप यादवने 4 षटकांत 1 बळी घेतला.
मयंक अग्रवालचे अर्धशतक हुकले : धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडून सलामीवीर मयंक अग्रवालने संयमी खेळी केली. तो 39 चेंडूत 49 धावा काढून बाद झाला. त्याला अक्षर पटेलने हकीमच्या हाती झेलबाद केले. मात्र तो बाद झाल्यावर हैदराबादची मधली फळी कोसळली. राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा व कर्णधार एडन मार्करम स्वस्तात बाद झाले.
सुंदर - भुवनेश्वरची प्रभावी गोलंदाजी : सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर दिल्लीला पहिला झटका बसला. सलामीवीर फिलिप सॉल्ट त्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने विकेटच्या मागे झेलबाद केले. दिल्लीकडून मनीष पांडेने 27 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. त्याला अक्षर पटेलने 34 चेंडूत 34 धावांसह उत्तम साथ दिली. हैदराबादकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. अनुभवी भुवनेश्वर कुमारनेही आज टिच्चून गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा देत 2 गडी बाद केले.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्करम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक ; बदली खेळाडू - नितीश रेड्डी, विव्रत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, राहुल त्रिपाठी
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग 11 : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा ; बदली खेळाडू - मुकेश कुमार, ललित यादव, प्रवीण दुबे, चेतन साकारिया, यश धुल
हेही वाचा : IPL 2023 : फाफ डु प्लेसिसने ऑरेंज कॅपवर केला कब्जा, सिराज आणि अर्शदीप पर्पल कॅपच्या शर्यतीत