ETV Bharat / sports

IPL 2023 : 'अखेर तेंडुलकरला मिळाली आयपीएल विकेट', मुलगा अर्जुनच्या कामगिरीवर सचिनने केले हे मजेदार ट्विट

author img

By

Published : Apr 19, 2023, 7:13 PM IST

केकेआरविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला अखेर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याची पहिली आयपीएल विकेट मिळाली. मुलगा अर्जुनच्या या कामगिरीवर वडील सचिन खूप खूश आहेत. सचिनने एक मजेदार ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

Sachin Tendulkar Arjun Tendulkar
सचिन तेंडुलकर अर्जुन तेंडुलकर

हैदराबाद : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने आयपीएलमध्ये आपली पहिली विकेट घेतली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्जुनने रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल पदार्पण केले. त्याच्या पदार्पणासह सचिन आणि अर्जुन हे आयपीएलमध्ये खेळणारी पहिली पिता आणि पुत्राची जोडी ठरली आहे. तथापि, 23 वर्षीय अर्जुन आपल्या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. केकेआर विरुद्ध त्याने दोन षटके टाकली ज्यात त्याने 17 धावा दिल्या होत्या.

  • A superb all-round performance by Mumbai Indians once again. Cameron Green impressed with both bat & ball. Ishan & Tilak’s batting is as good as it gets! The IPL is getting more interesting every day. Great going boys!💙

    And finally a Tendulkar has an IPL wicket!😛#SRHvMI pic.twitter.com/e4MAFEZyjY

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात धारदार गोलंदाजी : हैदराबादविरुद्ध त्याच्या स्पेलच्या पहिल्या दोन षटकांमध्येही तो विकेट रहित होता. पण जेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शेवटच्या षटकात त्याच्यावर 20 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी दिली, तेव्हा अर्जुन त्या कसोटीला खरा उतरला. शेवटच्या षटकात त्याने धारदार यॉर्कर टाकत 5 चेंडूत केवळ 5 धावा दिल्या. तसेच त्याने या षटकात भुवनेश्वर कुमारची विकेटही घेतली. ही त्याची पहिली आयपीएल विकेट आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या हॅट्ट्रिकनंतर एक ट्विट केले आणि म्हटले की, मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. कॅमेरून ग्रीनने बॉल आणि बॅट दोन्हीनेही उत्तम कामगिरी केली. ईशान आणि तिलक यांंनीही उत्कृष्ट फलंदाजी केली, आणि शेवटी तेंडुलकरला आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली आहे.

रोहित शर्मानेही केले कौतुक : सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही अर्जुनचे कौतुक केले. रोहित म्हणाला की, अर्जुन खूप आत्मविश्वासू असून तो त्याच्या योजनांबद्दल स्पष्ट आहे. तो तीन वर्षांपासून या संघाचा भाग आहे. त्याला काय करायचे आहे हे त्याला माहीत आहे. तो नवीन चेंडू स्विंग करण्याचा आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या 5 सामन्यातील तीन विजयानंतर मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. मुंबईचा पुढील सामना 22 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्जशी होणार आहे.

हेही वाचा : IPL 2023 : हा आहे मुंबई इंडियन्सचा नवा हिरो, फलंदाजीत संघातील दिग्गज खेळाडूंना टाकले मागे!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.