नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंचा दबदबा दिसतो आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या 28 सामन्यांच्या आकडेवारीकडे पाहिले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत आरसीबीचाच मोहम्मद सिराज आहे पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुणतालिकेच राजस्थानने अव्वल स्थान कायम राखले आहे.
ऑरेंज कॅपची शर्यत : या वर्षीच्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने 343 धावांसह मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानी दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. त्याच्या 285 धावा झाल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 279 धावा केल्या आहेत. कोहली डेव्हिड वॉर्नरपेक्षा फक्त 5 धावांनी मागे आहे. यानंतर जोस बटलर आणि व्यंकटेश अय्यर यांचा क्रमांक लागतो.
पर्पल कॅपची शर्यत : आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंना पर्पल कॅप दिली जाते. पर्पल कॅपच्या शर्यतीत बंगळुरूच्या मोहम्मद सिराजने मार्क वुड, राशिद खान आणि यजुवेंद्र चहल यांना मागे टाकून आघाडी घेतली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या आहेत. त्या खालोखाल मार्क वुड, राशिद खान आणि चहल यांच्या प्रत्येकी 11 विकेट्स आहेत. मोहम्मद शमीने एकूण 10 विकेट घेतल्या असून तो पाचव्या स्थानी आहे.
गुणतालिका : जर आपण संघांच्या स्थितीबद्दल बोललो तर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सचे प्रत्येकी 8 गुण आहेत. परंतु चांगल्या रनरेटच्या आधारावर राजस्थान रॉयल्स संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी 5 संघ 6 - 6 गुणांसह तिसऱ्या ते सातव्या स्थानी आहेत. केकेआर आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघाने प्रत्येकी 2 सामने जिंकून केवळ 4 गुण मिळवले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 1 सामना जिंकून गुणतालिकेत अगदी तळाशी आहे.
हेही वाचा : IPL 2023 : रोहित शर्मा जिओ सिनेमाचा नवा ब्रँड अॅम्बेसेडर, प्रोमो आणि अॅड कॅम्पेनमध्ये झळकणार