मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 42 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ज्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 विकेट गमावत 212 धावा केल्या. मुंबईसमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 19.3 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा करत सामना जिंकला. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर लागोपाठ षटकार मारून सामना जिंकत रोमांच उभे केले.
-
1️⃣0️⃣0️⃣0️⃣th IPL match. Special Occasion...
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
...And it ends with an electrifying finish courtesy Tim David & @mipaltan 💥💥💥
Scorecard ▶️ https://t.co/trgeZNGiRY #IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/qK6V5bqiWV
">1️⃣0️⃣0️⃣0️⃣th IPL match. Special Occasion...
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
...And it ends with an electrifying finish courtesy Tim David & @mipaltan 💥💥💥
Scorecard ▶️ https://t.co/trgeZNGiRY #IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/qK6V5bqiWV1️⃣0️⃣0️⃣0️⃣th IPL match. Special Occasion...
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
...And it ends with an electrifying finish courtesy Tim David & @mipaltan 💥💥💥
Scorecard ▶️ https://t.co/trgeZNGiRY #IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/qK6V5bqiWV
आरआरची फलंदाजी : राजस्थान संघाने 20 षटकात 212 धावा केल्या. ज्यामध्ये जैस्वालने 124 धावा, जोस बटलर 18 धावा, संजू सॅमसन 14 धावा, देवदत्त पडिकल 2 धावा, जेसन 11 धावा, ध्रुव 2 धावा, अश्विन 8 धावा (नाबाद) आणि बोल्ट 0 धावा (नाबाद).
मुंबईची गोलंदाजी : मुंबईने प्रथम गोलंदाजी करताना 20 षटकांत 7 विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये कॅमेरूनने 3 षटकांत 0 बळी, जोफ्राने 4 षटकांत 1 विकेट, रिलेने 4 षटकांत 1 बळी, पियुषने 4 षटकांत 2 विकेट, कुमारने 2 षटकांत 0 धावा देत 0 आणि अर्शद खानने 3 षटकांत 3 विकेट घेतल्या.
-
Pure emotions after winning a last-over classic courtesy Tim David!#IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/kaYGpcG0Nq
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pure emotions after winning a last-over classic courtesy Tim David!#IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/kaYGpcG0Nq
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023Pure emotions after winning a last-over classic courtesy Tim David!#IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/kaYGpcG0Nq
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
जोफ्रा आर्चर परतणार: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमन करणार आहे. आर्चर दुखापतीमुळे शेवटचे काही सामने खेळू शकला नव्हता. रिले मेरेडिथला त्यांच्या संघात राहण्यासाठी बाहेर जावे लागेल. तर नेहल वढेरा आणि अर्जुन तेंडुलकर संघात राहतील. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहिल.
ट्रेंट बोल्ट ही परतणार: राजस्थान रॉयल्स संघाने सलग दोन पराभवानंतर शेवटचा सामना जिंकला. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना 32 धावांनी जिंकला. मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी संघात एक बदल होणार आहे. वानखेडेवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेगवान गोलंदाजांची मदत होईल. त्यामुळे एडम झाम्पाच्या जागी किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संधी आहे.
-
.@surya_14kumar scored a remarkable fifty in a match-winning chase for @mipaltan and he becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvRR contest in #TATAIPL 👊🏻
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/HVHwRLZxYK
">.@surya_14kumar scored a remarkable fifty in a match-winning chase for @mipaltan and he becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvRR contest in #TATAIPL 👊🏻
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/HVHwRLZxYK.@surya_14kumar scored a remarkable fifty in a match-winning chase for @mipaltan and he becomes our 🔝 performer from the second innings of the #MIvRR contest in #TATAIPL 👊🏻
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/HVHwRLZxYK
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान ; इम्पॅक्ट प्लेअर - नेहल वढेरा, रमणदीप सिंग, विष्णू विनोद, शम्स मुलाणी, अर्जुन तेंडुलकर
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल ; इम्पॅक्ट प्लेअर - डोनोवन फरेरा, मुरुगन अश्विन, रियान पराग, कुलदीप यादव, कुलदीप सेन
संजू सॅमसन : आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. विकेट चांगली दिसत आहे. आम्ही आमच्या ताकदीवर टिकून राहण्याचा आणि एकत्रित खेळ करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळत आहोत आणि संघ चांगल्या स्थितीत आहे. ही परिस्थिती भिन्न आहे, परंतु आम्ही आमच्या कौशल्यावर टिकून राहू. संघ व्यवस्थापन आणि फ्रँचायझी आम्हाला उत्साही ठेवण्याचे काम उत्तम करत आहेत. बोल्ट संघात परततो आहे असे त्याने सुरवातीलाच स्पष्ट केले होते.
रोहित शर्मा : आम्ही गेल्या वर्षीही याच दिवशी याच विरोधकांविरुद्ध खेळलो होतो आणि निकाल आमच्या बाजूने लागला होता. आशा आहे की आजही तसेच होईल. ही एक चांगली विकेट आहे. आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. आम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. हा हंगाम चढ - उताराचा राहिला आहे. आम्ही काही चांगले क्रिकेट खेळलो मात्र त्यात सातत्य ठेवू शकलो नाही. आम्हाला चांगला ब्रेक मिळाला आणि आशा आहे की आम्ही चांगली कामगिरी करू शकू. आमच्या संघात दोन बदल आहेत - बेहरेनडॉर्फ आणि अर्जुन तेंडुलकरच्या जागी जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान परतले आहेत.
हेही वाचा : IPL 2023 : पंजाबचे तीन गडी बाद, करन-लिव्हिंगस्टोन क्रिजवर