ETV Bharat / sports

IPL 2023: गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून केला पराभव - Gujarat Titans defeated Punjab Kings

गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला. गुजरातचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय आहे. गुजरात संघ या विजयासह गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये सामील झाला आहे.

IPL 2023
गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा सहा गडी राखून केला पराभव
author img

By

Published : Apr 14, 2023, 6:45 AM IST

Updated : Apr 14, 2023, 7:28 AM IST

मोहाली : गुजरात टायटन्स संघाने पंजाब किंग्ज विरुद्धचा हा सामना ६ विकेट्सने जिंकला. हा या मोसमातील गुजरात टायटन्सचा तिसरा विजय आहे. शुभमन गिलने या सामन्यात गुजरात संघासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये मोहित शर्माचे उत्कृष्ट पुनरागमन झाले. शुभमन गिलच्या 49 चेंडूत 67 धावा जोरावर गुजरात टायटन्सने गुरु पंजाब किंग्जवर सहाकेट्सने विजय मिळवला. पंजाबच्या फलंदाजांना गुरूवारी झालेल्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही.

पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन, भानुका राजपाक्षे हे काही खास कामगिरी करू शकले नाहीत. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने दोन बळी घेतले. इतर गोलंदाजांना त्यावेळी प्रत्येकी एक विकेट मिळाली. आयपीएलच्या १६ व्या मोसमातील १८व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. गुजरातचा शुभमन गिल १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. लक्ष्य पूर्ण करताना त्याने अर्धशतकी खेळी केली. गुजरात संघाने या सामन्यात १९.५ षटकांत लक्ष्य गाठले आहे.

गुजरात टायटन्स संघाला वेगवान सुरुवात : शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा या जोडीने १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला वेगवान सुरुवात केली. शुभमन गिल आणि रिद्धिमान साहाने मिळून पहिल्या विकेटसाठी २८ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली होती. पहिल्या ६ षटकांत गुजरात संघाने १ गडी गमावून ५६ धावा केल्या होत्या. साई सुदर्शन शुभमन गिलला साथ देण्यासाठी वृद्धिमान साहा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मैदानात आला. या सामन्यात शुभमन गिलने ४९ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरनेही १७ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी राहुल तेवतिया आला. त्याने २ चेंडूत ५ धावा केल्या. या सामन्यात पंजाब संघाकडून कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, सॅम करन आणि हरप्रीत ब्रार यांनी १-१ बळी घेतला.

हेही वाचा : PBKS Vs GT IPL 2023 LIVE: गिल आणि सुदर्शन क्रीजवर उपस्थित, गुजरात टायटन्सचा स्कोअर 10 ओव्हरनंतर 80/1

Last Updated : Apr 14, 2023, 7:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.