ETV Bharat / sports

IPL 2023 : अवकाळी पावसाचा आयपीएलला फटका; आज होणार अंतिम सामना - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स

आयपीएल फायनलबाबत अधिकृत अपडेट आले आहे. रात्री 11 वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही, त्यामुळे हा सामना सोमवारी खेळवला जाणार आहे. सध्या अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मैदानावर तळे साचले आहे.

Gujrat Titans vs Chennai Super Kings
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स
author img

By

Published : May 28, 2023, 7:22 PM IST

Updated : May 29, 2023, 8:06 AM IST

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे रविवारी होणारा आयपीएलचा अंतिम सामना पुढे ढकलण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. पावसाने उसंत न घेतल्याने रविवारी न झालेला हा सामना आज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पावसामुळे आयपीएलचा खेळ न झाल्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर देशभरातून आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र आज पावसाने उसंत दिल्यास हा सामना होण्याची शक्यता असल्याने क्रिकेट चाहते अहमदाबादमध्येच तळ ठोकून बसले आहेत.

मुसळधार पाऊस सुरु : IPL 2023 चा अंतिम सामना पावसामुळे विस्कळीत झाला आहे. दरम्यान, आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की पावसानंतर, कव्हर्स पुन्हा मैदानावर टाकण्यात आले. मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षक सामना सुरू होण्याची वाट पाहत होते. अहमदाबादमध्ये 15 मिनिटे पाऊस थांबला होता. मैदानावरून कव्हर्स काढून टाकण्यात आले आणि ग्राउंडमन मैदानातील पाणी काढून मैदान कोरडे करण्यात गुंतले होते, पण अहमदाबादमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा मैदानावर कव्हर्स टाकल्या गेली. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज झाले.

  • UPDATE from Ahmedabad 🚨

    Overs will start reducing after 9:35 PM IST. #TATAIPL | #Final

    — IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाऊस थांबला तर झाले असते षटके कमी : जर सामना 9:35 पर्यंत सुरू झाला असता, तर 20 - 20 षटकांचा सामना खेळला जाणार होता. त्यानंतर वेळेनुसार ओव्हर कट केले जाणार होते. सामना 12:06 मिनिटांनी सुरू झाल्यास, 5 - 5 षटकांचा सामना खेळवला जाणार होता. रविवारी पाऊस थांबून सामना सुरू झाला असता, तर रात्री 9:45 (19 षटकांचा खेळ), रात्री 10 (17 षटकांचा खेळ), रात्री 10:30 (15 षटकांचा खेळ) होणार होता, मात्र पावसाने थांबण्याचे नाव न घेतल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला.

अहमदाबादमध्ये दोन दिवस पावसाचा अलर्ट : टाटा IPL 2023 चा अंतिम सामना रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. अहमदाबाद आणि आसपासच्या भागात पाऊस पडल्याने मैदानाला कव्हर्सने झाकण्यात आले आहे. हवामान खात्याने अहमदाबादमध्ये दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी केला होता. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 26 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर 2 चा सामना देखील पावसामुळे उशिरा सुरू झाला होता.

IPL फायनल पावसाने वाहून गेल्यास काय होईल? : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत, रविवारी सामना न झाल्यास सोमवारी सामना खेळवला जाईल. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास डकवर्थ लुईस नियमांचा वापर केला जाईल. तसे न झाल्यास उभय संघांमध्ये 5 - 5 षटकांचा सामना खेळवला जाईल. जर हे देखील शक्य होत नसेल तर सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित केला जाईल. जर यापैकी काहीही शक्य झाले नाही, तर साखळी टप्प्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सला आयपीएल 2023 चे चॅम्पियन म्हणून घोषित केले जाईल.

अंबाती रायुडूचा शेवटचा सामना : अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईचा फलंदाज अंबाती रायुडूने आयपीएलमधून संन्यासाची घोषणा केली आहे. याचाच अर्थ आजचा सामना रायुडूचा शेवटचा आयपीएल सामना असेल. रायुडूने 203 आयपीएल सामन्यांमध्ये 28.29 ची सरासरी आणि 132.38 च्या स्ट्राइक रेटने एकूण 4329 धावा केल्या आहेत. रायूडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. त्याने 2011 मध्ये कोलकाता विरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मुंबईला विजय मिळवून दिला होता.

हेही वाचा :

  1. IPL 2023 : भारतीय क्रिकेटचा राजकुमार मोडेल किंग कोहलीचा विक्रम? आज शुभमन गिलवर असतील सर्वांच्या नजरा
  2. IPL 2023 : आज ठरणार IPL चा विजेता, धोनीच्या सीएसकेसमोर हार्दिकच्या गुजरातचे आव्हान ; जाणून घ्या सर्वकाही

Last Updated : May 29, 2023, 8:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.