पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौदावा सामना आज पुण्यातील एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 4 बाद 161 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कोलकाता संघाला 162 धावांचे लक्ष्य दिले आहे.
-
Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
23 runs in the final over as #MumbaiIndians post a total of 161/4 on the board.#KKR chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/nTrWnZ6EsD
">Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
23 runs in the final over as #MumbaiIndians post a total of 161/4 on the board.#KKR chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/nTrWnZ6EsDInnings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
23 runs in the final over as #MumbaiIndians post a total of 161/4 on the board.#KKR chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/nTrWnZ6EsD
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव (52) आणि तिलक वर्मा (नाबाद 38) यांनी शानदार फलंदाजी केली. एमआयसाठी सूर्यकुमार आणि वर्मा यांनी 49 चेंडूत 83 धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. त्याचवेळी उमेश यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
-
That's a FIFTY for @surya_14kumar 👌👌
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Back in the side and instantly makes a mark 👏👏
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/ytjVM50o07
">That's a FIFTY for @surya_14kumar 👌👌
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Back in the side and instantly makes a mark 👏👏
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/ytjVM50o07That's a FIFTY for @surya_14kumar 👌👌
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Back in the side and instantly makes a mark 👏👏
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/ytjVM50o07
तिसर्या क्रमांकावर आलेल्या देवाल्ड ब्रेविसने ( Dewald Brewis ) इशान किशनसोबत काही झटपट शॉट्स खेळले. पण वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 19 चेंडूत 29 धावा करून ब्रेव्हिस बाद झाला, त्यामुळे मुंबईने 8 षटकांत 2 गडी गमावून 42 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने इशानसह संघासाठी काही महत्त्वाच्या धावा जोडल्या, पण 11व्या षटकात कमिन्सच्या चेंडूवर धावा काढण्याच्या प्रक्रियेत इशान (14) श्रेयस अय्यरकडे झेल देत बाद झाला.
-
Pat Cummins strikes and Ishan Kishan has to go.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He departs for 14 runs.
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/g7KRObsatQ
">Pat Cummins strikes and Ishan Kishan has to go.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
He departs for 14 runs.
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/g7KRObsatQPat Cummins strikes and Ishan Kishan has to go.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
He departs for 14 runs.
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/g7KRObsatQ
15 षटकांत संघाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 85 धावांपर्यंत पोहोचली. यानंतर वर्मा आणि सूर्यकुमार यांनी धमाकेदार फटकेबाजी करत संघाला 16.1 षटकांत 100 च्या पुढे नेले. यानंतर दोघेही केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई करत राहिले आणि 18 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या सुनील नरेनच्या षटकांत 14 धावा झाल्या, ज्यामुळे संघाची धावसंख्या तीन बाद 129 अशी झाली.
यासह सूर्यकुमारने 19व्या षटकात आंद्रे रसेलच्या चेंडूवर चौकार मारून 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमारने 36 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 52 धावा करून कमिन्सचा बळी ठरला. तसेच त्याने वर्मासोबत 49 चेंडूत 83 धावांची यशस्वी भागीदारी केली. किरॉन पोलार्डने ( Kieron Pollard ) दोन षटकार आणि एक चौकार मारून संघाची धावसंख्या 20 षटकांत चार गडी गमावून 161 धावांवर नेली. वर्माने 27 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा केल्या. त्याचवेळी पोलार्ड 5 चेंडूत 22 धावा करून नाबाद राहिला.
हेही वाचा - IPL 2022 Updates : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे 'हा' वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर