ETV Bharat / sports

IPL 2021: विराट कोहली आयपीएलविषयी काय म्हणाला? - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे. या सामन्याआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएल वर्षागणिक रोमांचक होत चालल्याचे म्हटलं आहे.

IPL 2021: Tournament only getting better, learning never stops for me, says Kohli
IPL 2021: विराट कोहली आयपीएलविषयी काय म्हणाला?
author img

By

Published : Sep 20, 2021, 5:01 PM IST

Updated : Sep 20, 2021, 8:12 PM IST

दुबई - आयपीएल वर्षागणिक रोमांचक होत चालले आहे. यातून मला आपल्या खेळात अधिक सुधारणा करण्याची प्रेरणा मिळले, असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे. आरसीबी आज आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपल्या अभियानाला सुरूवात करणार आहे. उभय संघातील सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहे.

आरसीबीच्या अधिकृत्त यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणतो की, आयपीएल केवळ सुधारत नाहीये तर यातून मला एक क्रिकेट आणि व्यक्ती म्हणून अधिक चांगले होण्यासाठी प्रेरित करत आहे. दरवर्षी जागतिक स्तरावरिल खेळाडूंसोबत खेळण्यास मिळणे, माझ्यासाठी नवे शिकण्याची संधी आहे. खेळात शिकणे कधी थांबू शकत नाही. दरवर्षी मी आपल्या खेळात सुधारणा करू इच्छितो. कारण आयपीएल अधिक सुधारत आहे.

केकेआरविरुद्धचा हा सामना विराट कोहलीचा आयपीएलमधील 200 वा सामना आहे. या सामन्याआधी केकेआरविषयी विराट कोहलीला विचारले असता तो म्हणाला की, स्पर्धेत केकेआरचा संघ सर्व आघाडीत मजबूत आहे. पण आम्हाला अव्वलस्थानावर राहण्याची गरज आहे. मागील सत्रात आम्ही चांगला खेळ केला होता. अशीच कामगिरी आम्ही पुढे देखील कायम राखू इच्छितो. आमच्याकडे खूप साऱ्या चांगल्या आठवणी आहेत. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही त्यातच गुंतून राहू.

दरम्यान, विराट कोहलीने रविवारी घोषणा केली आहे की, तो आयपीएल 2021 नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणार आहे. त्याआधी त्याने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा - MI Vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दमदार खेळीबद्दल काय म्हणाला ऋतुराज गायकवाड

हेही वाचा - भेटवस्तू आणि स्मृती चिन्हाच्या ई लिलावात भाग घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

Last Updated : Sep 20, 2021, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.