नवी दिल्ली - आयपीएलचा 27 वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने ४ गडी राखून चेन्नई संघावर विजय मिळवला आहे. हा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने सामन्यात टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईला विजयासाठी चेन्नईने 229 धावांचे तगडे आव्हान दिले होते.
मुंबईचा डाव
चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. त्यानंतर मुंबईनेही फलंदाजीला दणक्यात सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडीने 71 धावांची खेळी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने रोहित शर्माला 35 धावांवर ऋतुराज गायकवाडच्या हाती कॅच आऊट केले. तर रविंद्र जडेजाने सुर्यकुमार यादवला 3 धावांवर एम एस धोनीच्या हाती कॅच ऑऊट केले आहे. फटकेबाजी करणाऱ्या डी कॉकला मोईन अलीने बाद केले आहे. सध्या मैदानात कायरन पोलार्ड 3 धाव, तर कृणाल पांड्या 14 धावांवर खेळत आहे.
- मुंबई इंडियन्सने 12 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 94 धावा पूर्ण केल्या आहेत.
चेन्नईचा डाव
चेन्नईला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. ऋतुराज गायकवाड कॅच आऊट झाला. मात्र, फाफ डु प्लेसिस आणि मोईन अली यांनी चांगलीच धावांची बरसात केली आहे. फाफ डु प्लेसिसने 50 धावा तर मोईल अलीने 58 धावांची खेळी केली आहे. मोईल अलीला जसप्रीत बुमराहने विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती कॅच आऊट केले. मोईनने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तर डु प्लेसिसला कायरन पोलार्डडने जसप्रीत बुमराहच्या हाती कॅच आऊट केले. पुढच्या चेंडूवर सुरेश रैनाला 2 धावांवर कॅच आऊट केले.
LIVE UPDATE
- मुंबईला विजयासाठी चेन्नईकडून 219 धावांचे तगडे आव्हान
- चेन्नईचा स्कोअर 4 विकेट्सनंतर 200 पार
- अंबाटी रायुडूने 20 चेंडूमध्ये 53 धावा कढत अर्धशतक पूर्ण केले आहे.
- अंबाटी रायुडू आणि रवींद्र जाडेजा या जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.
- चेन्नईने 17 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 174 धावा केल्या आहेत.
- अंबाटी रायुडूने 16 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूवर धवल कुलकर्णीच्या बॉलिंगवर सलग 2 सिक्स लगावले आहे.
- सध्या मैदानात अंबाटी रायडू आणि रविंद्र जडेजा फडकेबाजी करत आहे.
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, ईशान किशन/नॅथन कुल्टर नाईल, जयंत यादव, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ड, पीयूष चावला, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तारे, क्रिस लीन
चेन्नई सुपर किंग्ज
एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाटी रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एनगिडी, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, इम्रान ताहीर.