अबुधाबी - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. आरसीबीचा संघाने पहिल्या टप्प्यात 7 पैकी 5 सामने जिंकली आहेत. ती लय कायम राखण्याच्या उद्देशाने आरसीबी मैदानात उतरेल. दुसरीकडे केकेआरला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रत्येक सामना महत्वाचा आहे. केकेआर 7 सामन्यांतून केवळ २ विजयांसह ७ व्या स्थानी आहे.
केकेआरची भिस्त शुभमन गिल, नितिश राणावर
आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात उभय संघ एकमेकांसमोर आले. यात आरसीबीने केकेआरवर 38 धावांनी विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात केकेआरची भिस्त शुभमन गिल आणि नितीश राणा यांच्यावर असेल. परंतु, हे दोन्ही खेळाडू पहिल्या टप्प्यात चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरले होते. गिलने पहिल्या सत्रात सात सामन्यात केवळ १३२ धावा केल्या आहेत. तर राणाच्या नावे २०१ धावा आहेत. त्याबरोबरच मॉर्गनलाही चांगली खेळी करावी लागणार आहे. दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी आणि शाकिब अल हसन यांनाही सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. त्याबरोबरच न्यूझीलंड संघातील गोलंदाज टिम साउदी याच्यावर मोठी जबबाबदारी असणार आहे.
आरसीबीकडे स्फोटक फलंदाजांचा भरणा -
आरसीबीच्या संघात स्फोटक फलंदाजांचा भरणा आहे. विराट कोहली, ए बी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल असे स्फोटक फलंदाज एकहाती सामना फिरवू शकतात. पण आरसीबीला विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्याकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा आहे. त्यांना हर्षल पटेल, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीची साथ मिळेल.
- आरसीबीचा संघ
- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एबी डिविलियर्स, नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चियन, युजवेंद्र चहल, रजत पाटीदार, दुष्मंत चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सीराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझहरुद्दीन, सचिन बेबी, वाहिंदु हसरंगा, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, काइल जॅमीसन, सुयश प्रभुदेसाई, के.एस. भरत, टिम डेव्हिड आणि आकाश दीप.
- केकेआरचा संघ
- इयान मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितिश राणा, शुभमन गिल, गुरकीरत सिंह मान, करुण नायर, राहुल त्रिपाठी, हरभजन सिंह, कमलेश नागरकोटी, सुनील नरेन, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम दुबे, टिम साउदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, वेंकटेश अय्यर, शेल्डन जैक्सन, टिम सीफर्ट.