ETV Bharat / sports

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे संघ क्रमवारीत भारताने पाकिस्तानला टाकले मागे; पटकावले तिसरे स्थान

एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा शानदार पराभव करून भारताने आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर ( India third in ICC ODI rankings ) मजल मारली आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

INDIA
भारत
author img

By

Published : Jul 13, 2022, 4:31 PM IST

दुबई: इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील ( ENG vs IND ODI Series ) पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. या विजयाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. भारत बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या संघ क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकून ( India overtook Pakistan ) तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला ( India third in ICC ODI rankings ). भारत 105 गुणांसह चौथ्या स्थानावर होता. परंतु मंगळवारी 10 गडी राखून विजय मिळवून त्यांचे 108 रेटिंग गुण झाले आहेत. पाकिस्तान 106 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे.

न्यूझीलंड 126 गुणांसह आघाडीवर ( New Zealand leads with 126 points ) आहे, तर 122 गुणांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप करत पाकिस्तानने भारताला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले होते. ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवाचाही त्याला फायदा झाला. मात्र, संघ तिसर्‍या क्रमांकावर फार काळ टिकू शकला नाही आणि भारताने पुन्हा एकदा या स्थानावर कब्जा केला.

या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ( India vs West Indies ODI series ) चांगली कामगिरी करून भारत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान आणखी मजबूत करू शकतो. भारताने इंग्लंडविरुद्धचे उरलेले दोन एकदिवसीय सामने गमावले तर संघ पाकिस्ताननंतर चौथ्या क्रमांकावर घसरेल. पाकिस्तान पुढील महिन्यात रॉटरडॅम येथे नेदरलँड्सविरुद्ध पुढील वनडे मालिका खेळणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ या दौऱ्यात पाच दिवसांत तीन 50 षटकांचे सामने खेळणार आहे.

हेही वाचा - Bumraha broke Kuldeep record : बुमराहने शानदार गोलंदाजी करताना कुलदीपचा मोडला विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.