नवी दिल्ली : 51 व्या आयपीएल 2023 मध्ये, गुजरात टायटन्स लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मोठे यश मिळवून खूप प्रशंसा मिळवत आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या संघाने 56 धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकल्याचा आनंद हार्दिकने व्यक्त केला. लखनौ संघाची कमान सांभाळणारा कृणाल पांड्याच्या संघाला पराभूत केल्यानंतर हार्दिकही भावूक झाला. यावरून दोन भावांमधील बंध खूप घट्ट असल्याचा अंदाज बांधता येतो. सामना संपल्यानंतर हार्दिक भावूक झाला आणि त्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
-
Just two young boys from Baroda who never gave up on their dreams ✨❤️ @krunalpandya24 pic.twitter.com/VkescaxBcn
— hardik pandya (@hardikpandya7) May 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Just two young boys from Baroda who never gave up on their dreams ✨❤️ @krunalpandya24 pic.twitter.com/VkescaxBcn
— hardik pandya (@hardikpandya7) May 7, 2023Just two young boys from Baroda who never gave up on their dreams ✨❤️ @krunalpandya24 pic.twitter.com/VkescaxBcn
— hardik pandya (@hardikpandya7) May 7, 2023
कृणाल पांड्याने लखनौ संघाचे नेतृत्व केले : या आयपीएल सामन्यात रविवार 7 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर एक मोठा विक्रम झाला. या सामन्यात गुजरात फ्रँचायझीचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि लखनौ सुपर जाटंट्सचा कर्णधार कृणाल पांड्या आमनेसामने होते. यातील विशेष बाब म्हणजे या दोन्ही भावांची जोडी आयपीएलच्या वेगवेगळ्या संघातून एकमेकांविरुद्ध मैदानात उतरली होती. केएल राहुल दुखापतीमुळे संघात पुनरागमन करू शकत नाही. यामुळे कृणाल पांड्याने रविवारी गुजरातविरुद्ध लखनौ संघाचे नेतृत्व केले.
-
Stuck to our plans and executed them 🤙 This team ✨❤️ @gujarat_titans pic.twitter.com/uzJYortcIL
— hardik pandya (@hardikpandya7) May 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Stuck to our plans and executed them 🤙 This team ✨❤️ @gujarat_titans pic.twitter.com/uzJYortcIL
— hardik pandya (@hardikpandya7) May 7, 2023Stuck to our plans and executed them 🤙 This team ✨❤️ @gujarat_titans pic.twitter.com/uzJYortcIL
— hardik pandya (@hardikpandya7) May 7, 2023
हार्दिकने कृणालसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला : गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला. त्याचवेळी हार्दिक पांड्या भावाच्या संघावर विजय मिळवल्यानंतर भावूक झाला. हार्दिकने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो दिसत आहेत. पहिला फोटो हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्यासोबतचा बालपणीचा आहे. दुसऱ्या फोटोत, दोन्ही भाऊ त्यांच्या संघाच्या पोशाखात कॅप घातलेले दिसत आहेत. हार्दिक कृणालच्या खांद्यावर आणि छातीवर हात ठेवताना दिसत आहे. या पोस्टसोबत त्यांनी 'बडोद्यातील दोन तरुण मुलं ज्यांनी कधीही त्यांची स्वप्नं सोडली नाहीत' असं एक गोंडस कॅप्शनही लिहिलं आहे.
हेही वाचा : IPL 2023 : आज कोलकाता भिडणार पंजाबशी, दोन्ही संघांमध्ये कोलकाताचा वरचष्मा |
हेही वाचा : Hapus Mangoes : हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; 'असा' ओळखा ओरिजनल हापूस |
हेही वाचा : IPL 2023 : हैदराबादने राजस्थानविरुद्धच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या नो बॉलमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला |