नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ( Delhi Capitals Retained Players ) इंडियन प्रीमियर लीग 2023 मिनी-लिलावापूर्वी ( Ahead of IPL 2023 Mini Auction ) दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Reveal List of Retained Players ) आज कायम ठेवलेल्या ( DC players after Retention ) आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. दिल्लीस्थित फ्रँचायझीने एकूण 19 खेळाडूंना कायम ठेवले ( Indian Premier League News ) असून त्यात सहा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
ज्या खेळाडूंना फ्रँचायझीने त्यांच्या गेल्या हंगामातील पाचव्या स्थानापासून कायम ठेवले आहे, त्यात भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋषभ पंत, पृथ्वी शॉचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूंना ठेवले कायम : चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यासह रिपल पटेल, सरफराज खान, यश धुल्ल, कमलेश नागरकोटी, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल आणि ललित यादव यांचा यामध्ये समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, वेस्ट इंडिजचा फलंदाज रोव्हमन पॉवेल, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्टजे आणि लुंगी एनगिडी, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श या सहा परदेशी खेळाडूंनाही कायम ठेवले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूंना सोडले : दरम्यान, फ्रँचायझीने चार खेळाडूंना सोडले आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडू मनदीप सिंग, केएस भरत आणि अश्विन हेब्बर आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक-फलंदाज टिम सेफर्ट यांचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सनेही अष्टपैलू शार्दुल ठाकूरला कोलकाता नाईट रायडर्ससंघाला विकले आहे आणि त्याच्या जागी अष्टपैलू अमन खानला संघात आणले आहे.
कायम ठेवलेले खेळाडू : भारतीय : ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रिपल पटेल, सरफराज खान, यश धुल, कमलेश नागरकोटी, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, ललित यादव.
भारताबाहेरील परदेशी खेळाडू : डेव्हिड वॉर्नर, रोव्हमन पॉवेल, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, मुस्तफिझूर रहमान, मिचेल मार्श.
या खेळाडूंना संघा बाहेर करण्यात आले आहे : टीम सेफर्ट, मनदीप सिंग, केएस भरत, अश्विन हेब्बर
व्यापार : शार्दुल ठाकूर याला कोलकाता नाईट रायडर्सला विकण्यात आले. त्याच्या जागी अष्टपैलू अमन खानला संघात स्थान देण्यात आले आहे.