जोहान्सबर्ग : भारताचा कर्णधार विराट कोहली ( India captain Virat Kohli ) सोमवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी पाठदुखीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात कोहलीच्या जागी उपकर्णधार केएल राहुल ( Vice-captain KL Rahul ) संघाची धुरा सांभाळत ( KL Rahul to lead India ) आहे. त्याने नाणेफेक करताना सांगितले की, 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या कसोटीसाठी कोहली उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
-
Toss Update - KL Rahul has won the toss and elects to bat first in the 2nd Test.
— BCCI (@BCCI) January 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Captain Virat Kohli misses out with an upper back spasm.#SAvIND pic.twitter.com/2YarVIea4H
">Toss Update - KL Rahul has won the toss and elects to bat first in the 2nd Test.
— BCCI (@BCCI) January 3, 2022
Captain Virat Kohli misses out with an upper back spasm.#SAvIND pic.twitter.com/2YarVIea4HToss Update - KL Rahul has won the toss and elects to bat first in the 2nd Test.
— BCCI (@BCCI) January 3, 2022
Captain Virat Kohli misses out with an upper back spasm.#SAvIND pic.twitter.com/2YarVIea4H
नाणेफेकसाठी मैदानात आलेल्या राहुलने सांगितले की, विराट कोहलीच्या पाठीच्या वरच्या भागात दुखत ( Virat Kohli suffers from upper back pain ) आहे. तो फिजिओच्या देखरेखीखाली असून पुढील कसोटीपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. त्याच्या जागी अष्टपैलू फलंदाज हनुमा विहारीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आपल्या फलंदाजीची लय शोधण्यासाठी धडपडणारा कोहली यापुढे केपटाऊनमधील मालिकेतील तिस-या आणि शेवटच्या सामन्यात ऐतिहासिक 100 वी कसोटी पूर्ण करू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेलाही तो मुकणार आहे.
हेही वाचा - IND South Africa 2nd Test : नाणेफेक जिंकून केएल राहूलने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय