ETV Bharat / sports

Asia Cup 2022 : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान 'या' दिवशी आमनेसामने - आशिया कप 2022 चे वेळापत्रक

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आशिया चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक ( Complete Asia Cup Schedule ) समोर आले आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. येथे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत आणि 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता त्यांच्यात स्पर्धा होईल.

IND vs PAK
IND vs PAK
author img

By

Published : Aug 2, 2022, 7:48 PM IST

हैदराबाद: आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर ( Asia Cup Schedule Announce ) झाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. शनिवार 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, यात श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानशी दुबईत होणार आहे.

भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे, जो आपले विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. यावेळी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे, ज्याकडे आशियाई संघ देखील टी-20 विश्वचषकापूर्वीची तयारी म्हणून पाहत आहेत. या स्पर्धेच्या हाय व्होल्टेज सामन्याबद्दल बोलायचे, तर तो सामना रविवार 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने ( IND vs PAK ) असतील. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते, जिथे भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

  • The wait is finally over as the battle for Asian supremacy commences on 27th August with the all-important final on 11th September.

    The 15th edition of the Asia Cup will serve as ideal preparation ahead of the ICC T20 World Cup. pic.twitter.com/QfTskWX6RD

    — Jay Shah (@JayShah) August 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या स्पर्धेत भारतही त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. सध्या 5 संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे, तर सहावा संघ पात्र होऊन येथे पोहोचेल. ही 13 दिवस चालणारी स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरू होईल, रविवारी 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना होईल. यावेळी आशिया चषक टी-20 स्वरूपात ( Asia Cup in T20 format ) खेळवला जाईल, तर यापूर्वी 2018 मध्ये ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली गेली होती, ज्याचे विजेतेपद भारताने जिंकले होते.

आशिया कप 2022 चे वेळापत्रक -

  • 27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
  • 28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
  • 30 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शारजा
  • 31 ऑगस्ट- भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई
  • 1 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई
  • 2 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शारजा
  • 3 सप्टेंबर- B1 वि B2, शारजाह
  • 4 सप्टेंबर- A1 वि A2, दुबई
  • 6 सप्टेंबर- A1 वि B1, दुबई
  • 7 सप्टेंबर- A2 वि B2, दुबई
  • 8 सप्टेंबर- A1 वि B2, दुबई
  • 9 सप्टेंबर- B1 वि A2, दुबई
  • 11 सप्टेंबर- फायनल, दुबई

सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळले जातील. यापूर्वी या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे होते. मात्र सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेने यजमानपद नाकारले आणि त्यानंतर ते युएईला देण्यात आले. याआधी बांगलादेशला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले होते, परंतु पावसाळा पाहता आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : भारतीय महिला संघाने रचला इतिहास; लॉन बॉल्स स्पर्धेमध्ये पहिल्यादाच पटकावले सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.