ETV Bharat / sports

प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण, केकेआरचा ठरला चौथा खेळाडू

कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण झाली आहे.

author img

By

Published : May 8, 2021, 3:48 PM IST

ipl 2021 : prasidh krishna tests covid positive fourth-player-from-kkr-to-be-tested-positive
प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण, केकेआरचा ठरला चौथा खेळाडू

मुंबई - कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कृष्णा कोरोनाची लागण झालेला केकेआरचा चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टिम सेफर्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण चक्रवर्ती आणि संदीपर वॉरियर आणि टीम सेफर्ट यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर सर्वांची चाचणी करण्यात आली. यात प्रसिद्ध कृष्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी प्रसिद्ध कृष्णाची निवड भारतीय संघात स्टॅडबॉय म्हणून करण्यात आली आहे. शुक्रवारी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, न्यूझीलंडचा खेळाडू टीम सेफर्ट याला कोरोनाची लागण झाल्याने, आयपीएलमध्ये सहभागी न्यूझीलंडचे खेळाडू, सहकारी स्टाफ तसेच समालोचक यांना मायदेशी परतता येणार नाही. ते पुढील काही दिवस भारतात राहणार आहेत. सेफर्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते सर्वजण एकत्रित न्यूझीलंडला रवाना होतील.

हेही वाचा - अजिंक्यने टोचून घेतली लस; फोटो शेअर करत देशवासियांना केलं आवाहन

हेही वाचा - ''वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'' व इंग्लंड विरुध्दच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.