नवी दिल्ली: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला (Fifteenth season of IPL) लवकरच सुरुवात होणार आहे. या अगोदर पंधराव्या हंगामाचा मेगा लिलाव होणार आहे. त्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरवात होणार आहे. यंदा हा हंगाम 8 संघात न होता 10 संघात होणार आहे. या वर्षीच्या हंगामापासून अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघ आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापैकी संजीव गोयंका यांच्या लखनऊ संघाने (Sanjeev Goenka owner of Lucknow team)आपल्या संघाचे नाव जाहीर केले आहे.
यंदा आयपीएल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लखनऊ संघाने आपल्या संघाचे नाव आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले आहे. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत आपल्या संघाचे नाव ‘लखनऊ सुपरजायंट्स’ (Lucknow Supergiants)असे ठेवले असल्याचा खुलासा केला आहे. हे नाव संजीव गोयंका यांच्या पहिल्या पुणे रायझिंग सुपरजायंटस संघाच्या नावाप्रमाणे आहे.
-
Team owner, Dr. Sanjiv Goenka, Chairman @rpsggroup unveils the name for the Lucknow IPL team. 😊👏🏼#LucknowSuperGiants #NaamBanaoNaamKamao #IPL2022 @IPL @BCCI @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/TvGaZlIgFR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Team owner, Dr. Sanjiv Goenka, Chairman @rpsggroup unveils the name for the Lucknow IPL team. 😊👏🏼#LucknowSuperGiants #NaamBanaoNaamKamao #IPL2022 @IPL @BCCI @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/TvGaZlIgFR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022Team owner, Dr. Sanjiv Goenka, Chairman @rpsggroup unveils the name for the Lucknow IPL team. 😊👏🏼#LucknowSuperGiants #NaamBanaoNaamKamao #IPL2022 @IPL @BCCI @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/TvGaZlIgFR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022
या अगोदर लखनऊ सुपरजायंट्स संघाने 22 जानेवारी रोजी आपल्या संघासाठी तीन खेळाडू ड्राफ्टमधून निवडले आहेत. ज्यामध्ये कर्णधार केएल राहुल (Captain KL Rahul), ऑस्ट्रलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस आणि रवि बिष्णोई यांचा समावेश आहे. या तिघांना अनुक्रमे 15, 11 आणि 4 कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात आले आहे.
-
And here it is,
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Our identity,
Our name.... 🤩🙌#NaamBanaoNaamKamao #LucknowSuperGiants @BCCI @IPL @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/OVQaw39l3A
">And here it is,
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022
Our identity,
Our name.... 🤩🙌#NaamBanaoNaamKamao #LucknowSuperGiants @BCCI @IPL @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/OVQaw39l3AAnd here it is,
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022
Our identity,
Our name.... 🤩🙌#NaamBanaoNaamKamao #LucknowSuperGiants @BCCI @IPL @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/OVQaw39l3A
तसेच केएल राहुल आणि रवि बिष्णोई हे अगोदर पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्याचबरोबर ऑस्ट्रलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस हा दिल्ली कॅपिटल संगाचा भाग होता. आता हे तिघे आयपीएल 2022 या सत्रात ‘लखनऊ सुपरजायंट्स’ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतील. या संघाच्या नेतृत्वाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर असणार आहे.
उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या लखनऊ सुपरजायंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर (Head Coach Andy Flower) आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी सलामवीर गौतम गंभीर या संघाच्या मेंटॉरची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहे. तसेच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया आपली भूमिका निभावतील.
हेही वाचा : ICC 2021 Award: बाबर आझम ठरला 2021चा वनडे क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू