मुंबई: आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेजमधील शेवटचा सामना म्हणजेच 70 वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( Sunrisers Hyderabad vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. कारण दोन्ही संघ या अगोदरच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे.
आजचा हा सामना जिंकून हैदराबाद आणि पंजाब हे दोन्ही संघ स्पर्धेचा शेवट चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतील. पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले, तर हैदराबादचा संघ सहा विजयांसह 12 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तर पंजाबचेही 12 गुण आहेत पण चांगल्या नेट रनरेटमुळे ते सातव्या स्थानावर आहेत. सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad Team ) स्पर्धेच्या मध्यभागी सलग पाच विजयांची नोंद केली, परंतु त्यानंतर संघ कधीच चांगल्या स्थितीत राहिला नाही.
-
A final ROAR from our 🦁s ahead of #SRHvPBKS 💪#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @mayankcricket @RajangadBawa @thisisbrar pic.twitter.com/kDUASSnY4B
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A final ROAR from our 🦁s ahead of #SRHvPBKS 💪#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @mayankcricket @RajangadBawa @thisisbrar pic.twitter.com/kDUASSnY4B
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 22, 2022A final ROAR from our 🦁s ahead of #SRHvPBKS 💪#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ @mayankcricket @RajangadBawa @thisisbrar pic.twitter.com/kDUASSnY4B
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 22, 2022
कर्णधार केन विल्यमसनची ( Captain Ken Williamson ) फलंदाज म्हणून खराब कामगिरी संपूर्ण स्पर्धेत कायम राहिली आणि त्याचा फटका त्याच्या संघाला सहन करावा लागला. मात्र, तो शेवटच्या सामन्यासाठी उपलब्ध नसून त्याच्या अनुपस्थितीत संघाची कमान कोणाकडे सोपवली जाते हे पाहणे बाकी आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत ग्लेन फिलिप्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
-
Silken arm extensions. Just @IamAbhiSharma4 being his classy best at the nets. 🔥🧡#SRHvPBKS #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/KB7vrRhqxw
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Silken arm extensions. Just @IamAbhiSharma4 being his classy best at the nets. 🔥🧡#SRHvPBKS #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/KB7vrRhqxw
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 22, 2022Silken arm extensions. Just @IamAbhiSharma4 being his classy best at the nets. 🔥🧡#SRHvPBKS #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/KB7vrRhqxw
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 22, 2022
मेगा लिलावानंतर कागदावर पंजाबचा संघ ( Punjab Kings Team ) खूपच मजबूत दिसत होता आणि एवढ्या मजबूत संघामुळे हा संघ किमान प्लेऑफमध्ये तरी नक्कीच पोहोचेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नसून आता शेवटच्या सामन्यात काही नवीन खेळाडूंना संधी द्यायला संघाला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर कर्णधार मयंक अग्रवालही खराब फॉर्ममध्ये असून तो शेवटच्या सामन्यात सलामीवीर म्हणून दिसणार की मधल्या फळीत खेळणार हे पाहणे बाकी आहे. शाहरुख खानला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.
पंजाब किंग्ज : शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, मार्को जेन्सन, जे सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार , शॉन अॅबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारुकी, उमरान मलिक आणि टी नटराजन.
हेही वाचा - Mi Vs Dc : मुंबईच्या विजयाने दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, बंगळुरूची एन्ट्री, बुमराह 'प्लेअर ऑफ द मॅच'