ETV Bharat / sports

IPL 2022, SRH vs LSG: लखनौकडून हैदराबाद संघाला 170 धावांचे लक्ष्य; केएल राहुल आणि दीपक हुडाची शानदार फटकेबाजी - Marathi cricket news

लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad ) संघात सामना खेळला जात आहे.प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्स संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 169 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.

SRH vs LSG
SRH vs LSG
author img

By

Published : Apr 4, 2022, 10:00 PM IST

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022 ) च्या 12 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad ) संघात सामना खेळला जात आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्स संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 169 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.

सनरायझर्स हैदराबादचा ( Sunrisers Hyderabad ) कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौ सुपरजायंट्सच्या संघात दुष्मंथा चमीराच्या जागी जेसन होल्डरचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, लखनौची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये तीन गडी बाद झाले आणि 6 षटकांनंतर 32/3 धावसंख्या होती. क्विंटन डी कॉक आणि एविन लुईस 1-1 आणि मनीष पांडेने 11 धावा केल्या.

यानंतर कर्णधार केएल राहुलने दीपक हुडाच्या साथीने संघाला 14 व्या षटकात 100 च्या पुढे नेले. दीपक हुडाने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, पण 16व्या षटकात 114 धावसंख्येवर 33 चेंडूत 51 धावा काढून तो बाद झाला. केएल राहुलने 40 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने 50 चेंडूत 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. तो 19व्या षटकात 144 धावसंख्येवर बाद झाला. 19व्या षटकात लखनौने 150 चा टप्पा ( Lucknow Super Giants ) ओलांडला. पण त्याच षटकात कृणाल पंड्या 6 धावा काढून बाद झाला. आयुष बदोनी (12 चेंडू 19) आणि जेसन होल्डर (3 चेंडू 8) यांनी संघाला 170 च्या जवळ नेले. सनरायझर्स हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हेही वाचा - Korea Open: भारताच्या 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.