मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) मधील 25 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) यांच्यात खेळला जात आहे. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार कोलकाताने 20 षटकांत 8 विकेट गमावत 175 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबादला विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य दिले आहे.
-
Innings Break!@NitishRana_27's fine fifty & @Russell12A's 49*-run blitz power @KKRiders to 175/8. 👏 👏@Natarajan_91 & Umran Malik pick 3 & 2 wickets respectively for @SunRisers. 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The #SRH chase to begin soon. #TATAIPL | #SRHvKKR
Scorecard ▶️ https://t.co/HbO7Uh4Tcq pic.twitter.com/Uvosu5Y9J8
">Innings Break!@NitishRana_27's fine fifty & @Russell12A's 49*-run blitz power @KKRiders to 175/8. 👏 👏@Natarajan_91 & Umran Malik pick 3 & 2 wickets respectively for @SunRisers. 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
The #SRH chase to begin soon. #TATAIPL | #SRHvKKR
Scorecard ▶️ https://t.co/HbO7Uh4Tcq pic.twitter.com/Uvosu5Y9J8Innings Break!@NitishRana_27's fine fifty & @Russell12A's 49*-run blitz power @KKRiders to 175/8. 👏 👏@Natarajan_91 & Umran Malik pick 3 & 2 wickets respectively for @SunRisers. 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2022
The #SRH chase to begin soon. #TATAIPL | #SRHvKKR
Scorecard ▶️ https://t.co/HbO7Uh4Tcq pic.twitter.com/Uvosu5Y9J8
कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकातच संघाला पहिला धक्का बसला. मार्को यान्सेनने अॅरॉन फिंचला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नटराजनने 5व्या षटकात व्यंकटेश अय्यरला बाद करून संघाला दुसरा धक्का दिला. त्याच षटकात त्याने सुनील नरेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दहाव्या षटकात उमरान मलिकने श्रेयस अय्यरला चौथा झटका दिला. कोलकाताकडून नितीश राणाने (54) अर्धशतक झळकावले. आंद्रे रसेलने 49 धावा केल्या.
कोलकाताला पाचवा धक्का उमरान मलिकने 13व्या षटकात शेल्डन जॅक्सनला बाद करून दिला. नितीश राणाला बाद करून नटराजनने संघाला सहावा धक्का दिला. भुवनेश्वर कुमारने 19व्या षटकात पॅट कमिन्सला बाद करत कोलकाताला 7वा धक्का दिला. त्याचवेळी 20व्या षटकात जगदीश सुचितने अमन खानला बाद करत संघाला 8वा धक्का दिला. हैदराबाद संघात एक बदल करण्यात आला. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जगदीश सुचितला संधी मिळाली. त्याच वेळी कोलकातामध्ये तीन बदल झाले. अजिंक्य रहाणेच्या जागी शेल्डन जॅक्सन आणि रसिक सलामच्या जागी अमन खान, तर सॅम बिलिंग्जच्या जागी आरोन फिंचला खेळवण्यात आले.
हेही वाचा - IPL 2022 Updates : दीपक चहर पाठोपाठ केकेआरचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर