ETV Bharat / sports

SRH Vs CSK : हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; धोनीची अग्निपरीक्षा

author img

By

Published : May 1, 2022, 7:37 PM IST

आयपीएलच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामातील 46 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( SRH Vs CSK ) यांच्यात होणार आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Sunrises Hyderabad Won Toss Opted Bowl ) आहे.

SRH Vs CSK
SRH Vs CSK

मुंबई - आयपीएलच्या पंधराव्या ( IPL 2022 ) हंगामातील 46 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( SRH Vs CSK ) यांच्यात होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Sunrises Hyderabad Won Toss Opted Bowl )आहे.

आयपीएलमध्ये सध्याच्या परिस्थितीत सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. हैदराबादने आठ सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामन्यांत विजय मिळाला आहे. तर, 3 सामन्यांतील विजयासह 10 गुण मिळाले आहेत. त्याचसोबत चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे. चेन्नईने आतापर्यंत 9 सामने खेळले असून, त्यातील 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 6 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला असून, 4 गुण मिळाले आहेत.

धोनीची अग्निपरीक्षा - आयपीएल मध्यावर आली असताना महात्वाची घडामोड चेन्नई संघात घडली आहे. रविंद्र जडेजाने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा धोनीकडे आले आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच रविंद्र जडेजाला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, कर्णधार पदी नियुक्ती केल्यानंतर संघाची आणि जडेजाची कामगिरी फार चांगली राहिली नाही. त्यामुळे आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जडेजा कर्णधार पदावरुन पाय उतार झाला. त्यामुळे तळाला पोहचलेल्या संघाला प्लेऑफमध्ये आणण्यासाठी आता धोनीला आज अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेवॉन कॉनवेने, अंबाती रायुडू, सिमरजित सिंग, रवींद्र जडेजा, एमएस धोनी ( कर्णधार आणि यष्टिरक्षक ), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी, महेश थिकशन.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन ( यष्टीरक्षक ), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन.

हेही वाचा - Rohit Sharma Birthday : हिटमॅन रोहितला पत्नीच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, "आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी..."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.