मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधाराव्या हंगामात आज (10 एप्रिल) डबल हेडर सामन्यातील दुसरा म्हणजे विसावा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Lucknow Super Giants vs Rajasthan Royals ) लढत होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात केएल राहुल आणि संजू सॅमसन या युवा कर्णधारांवर आपापल्या संघाची मदार असणार आहे.
-
A cracking contest awaits at the Wankhede Stadium! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The @IamSanjuSamson-led @rajasthanroyals will face @LucknowIPL, led by @klrahul11 in Match 2⃣0⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏 #RRvLSG
Which team are you rooting for tonight? 🤔 🤔 pic.twitter.com/thFisLIOFW
">A cracking contest awaits at the Wankhede Stadium! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
The @IamSanjuSamson-led @rajasthanroyals will face @LucknowIPL, led by @klrahul11 in Match 2⃣0⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏 #RRvLSG
Which team are you rooting for tonight? 🤔 🤔 pic.twitter.com/thFisLIOFWA cracking contest awaits at the Wankhede Stadium! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
The @IamSanjuSamson-led @rajasthanroyals will face @LucknowIPL, led by @klrahul11 in Match 2⃣0⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏 #RRvLSG
Which team are you rooting for tonight? 🤔 🤔 pic.twitter.com/thFisLIOFW
सुपरजायंट्स आणि रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना अपेक्षित -
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना अपेक्षित आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लखनौ संघाने हंगामाची सुरुवात चांगली केली असून पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकून संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. लोकेश राहुलच्या ( Captain Lokesh Rahul ) संघाला पहिल्याच सामन्यात पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्स या दुसऱ्या संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर संघाने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघाचा पराभव केला आहे. राहुलने आपल्या फलंदाजी आणि कर्णधारपदाने प्रभावित केले आहे, तर एविन लुईस, दीपक हुडा आणि आयुष बडोनी यांनी फलंदाजीसह उत्कृष्ट कामगिरी करून संघाला संतुलन आणि स्थिरता दिली आहे.
-
The Royals return to Wankhede Stadium for a first-time clash vs LSG tonight. That deserves some hype! 📰🔥 #RoyalsFamily | #HallaBol | #RRvLSG | @SHetmyer
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Royals return to Wankhede Stadium for a first-time clash vs LSG tonight. That deserves some hype! 📰🔥 #RoyalsFamily | #HallaBol | #RRvLSG | @SHetmyer
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2022The Royals return to Wankhede Stadium for a first-time clash vs LSG tonight. That deserves some hype! 📰🔥 #RoyalsFamily | #HallaBol | #RRvLSG | @SHetmyer
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2022
गोलंदाजीबद्दल बोलायचे तर वेगवान गोलंदाज आवेश खान आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई यांनी टी20 क्रिकेटमधील काही प्रस्थापित नावांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरच्या जोडीने लखनौच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत झाली आहे. दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सलामीवीर क्विंटन डी कॉकनेही ( Opener Quinton de Kock ) 52 चेंडूत 80 धावा केल्या होत्या. बदोनी आणि कृणाल पांड्या यांनीही सुरेख खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
-
📣 Meherbaan, kadardaan, sahibaan! 📣
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Taiyaar ho jaaiye, maidaan par aaj utar rahe hai aapke Supergiants, machaane toofaan!
Predict the XI ⬇️ and win Super Giants merchandise! #AbApniBaariHai💪🏽 #ipl2022 🏆 #lsg2022 #bhaukaalmachadenge #t20 #tataipl #lucknowsupergiants #lucknow pic.twitter.com/TsUQF4maRh
">📣 Meherbaan, kadardaan, sahibaan! 📣
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2022
Taiyaar ho jaaiye, maidaan par aaj utar rahe hai aapke Supergiants, machaane toofaan!
Predict the XI ⬇️ and win Super Giants merchandise! #AbApniBaariHai💪🏽 #ipl2022 🏆 #lsg2022 #bhaukaalmachadenge #t20 #tataipl #lucknowsupergiants #lucknow pic.twitter.com/TsUQF4maRh📣 Meherbaan, kadardaan, sahibaan! 📣
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2022
Taiyaar ho jaaiye, maidaan par aaj utar rahe hai aapke Supergiants, machaane toofaan!
Predict the XI ⬇️ and win Super Giants merchandise! #AbApniBaariHai💪🏽 #ipl2022 🏆 #lsg2022 #bhaukaalmachadenge #t20 #tataipl #lucknowsupergiants #lucknow pic.twitter.com/TsUQF4maRh
दिल्लीच्या भक्कम फलंदाजी फळीविरुद्ध शानदार गोलंदाजीमुळे कृष्णप्पा गौतमचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे हा ऑफस्पिनरही रॉयल्सविरुद्ध योगदान देण्यास उत्सुक असेल. राहुलला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आलेला नाही आणि रविवारी तो सुधारण्याचा प्रयत्न करेल. तथापि, लखनौचा रस्ता तितका सोपा होणार नाही, कारण चौथ्या क्रमांकावर असलेला राजस्थान रॉयल्स संघ सध्याच्या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ म्हणून उदयास आला आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
बंगळुरूविरुद्धच्या पराभवापूर्वी संघाने सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचा अनुक्रमे 61 आणि 23 धावांनी पराभव केला होता. शॉर्ट फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला जोस बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये ( Jose Butler Excellent form ) आहे. त्याने शतक झळकावल्यानंतर आरसीबीविरुद्ध 47 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. बटलरशिवाय देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायर हेही वेगवान धावा करण्यात सक्षम आहेत. कर्णधार संजू सॅमसनकडेही ( Captain Sanju Samson ) गोलंदाजीचे कोणतेही आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे.
वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने ( Fast bowler Navdeep Saini ) गेल्या काही सामन्यांमध्ये धावा दिल्या आहेत. फलंदाजीत योगदान देण्यात अपयशी ठरलेल्या रियान परागला सहाव्या क्रमांकावर कायम ठेवले जाते का, हेही पाहावे लागेल. बटलर, हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट या तीन परदेशी खेळाडूंसह, रॉयल्सकडे जिमी नीशमसारखा अष्टपैलू खेळाडू खेळण्याचा पर्याय आहे. जो प्लेइंग इलेव्हनला अधिक संतुलन देऊ शकतो.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, प्रशांत कृष्णा, रियान पराग, नॅथन कुल्टर-नाईल, देवदत्त पडिक्कल, नवदीप सैनी, करुण नायर, रेसी व्हॅन ड्यूसेन डर नीशम, अनुनय सिंग, डॅरिल मिशेल, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, ओबेद मॅककॉय, तेजस बारोका आणि केसी करिअप्पा.
लखनौ सुपर जायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, एविन लुईस, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, काइल मायर्स, आवेश खान, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई, आयुष बडोनी, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, मयंक यादव, मोहसीन खान आणि करण शर्मा.
हेही वाचा - Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचे यश कोल्हापूरला अर्पण; पृथ्वीराज पाटीलची प्रतिक्रिया